ETV Bharat / city

पुणे-  5,395 नवीन कोरोनाबाधितांची नोंद; 68 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 16, 2021, 2:07 AM IST

शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 54 हजार 351 इतकी आहे. शहरात सध्या 1,172 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Pune corona update
पुणे कोरोना अपडेट

पुणे - शहरातील कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभरात (गुरुवारी) नवीन 5, 395 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात 4, 321 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण 68 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मृत झालेल्या 68 कोरोनाबाधितांपैकी 18 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 54 हजार 351 इतकी आहे. शहरात सध्या 1,172 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी 21 हजार 922 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात कोरोनाची स्थिती पाहिली तर आजपर्यंत 3 लाख 44 हजार 924 लोकसंख्येला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 89 हजार 122 नागरिक बरे झाले आहेत.

हेही वाचा-रिलायन्सच्या जामनगर प्लांटमधून महाराष्ट्राला मिळणार ऑक्सिजन

100 रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू-

शहरातील कंटेन्मेंट झोनचा विचार केला तर जवळपास सर्वच भागात मायक्रो कंटेन्मेंट करण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग सर्वदूर शहरात असल्याने ठिकठिकाणी सोसायट्या अपार्टमेंटमध्ये मायक्रो कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. सरकारी, महानगरपालिकेचे आणि खासगी असे एकूण 100 रुग्णालये ही सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व रुग्णालयात एकूण 25 हजार 455 बेड उपलब्ध आहेत. त्यामधील केवळ 4 हजार 190 बेड रिकामे आहेत.

हेही वाचा-कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

राज्यात 61 हजार 695 नव्या रुग्णाची नोंद

राज्यात मागील 24 तासांत 61 हजार 695 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे तर 349 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 53 हजार 335 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एकूण 36 लाख 39 हजार 855 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.