ETV Bharat / city

Bulli Bai App Case : बुल्ली बाई अॅप प्रकरणी केंद्राने एसआयटी स्थापन करावी - नीलम गोऱ्हे - केंद्राने विशेष तपास पथक स्थापन करावे

बुल्ली बाई अॅप प्रकरणी ( Bulli Bai App Case ) केंद्र सरकारने विशेष तपास पथक ( Central Government to set up SIT ) स्थापन करण्याची विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे ( Neelam Gorhe ) यांनी केली आहे.

नीलम गोऱ्हे
नीलम गोऱ्हे
author img

By

Published : Jan 5, 2022, 8:22 PM IST

पुणे - बुल्ली बाई अॅप प्रकरणी ( Bulli Bai App Case ) केंद्राने विशेष तपास पथक स्थापन करावे, ( Central Government to set up SIT ), अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ( Neelam Gorhe ) केली आहे.

बोलताना नीलम गोऱ्हे

काही दिवसांपासून सुरू असलेल्या बुल्ली बाई अॅप प्रकरणी केंद्र सरकारने सायबर क्राइममधील तज्ज्ञांच्या अधिपत्याखाली राष्ट्रीय स्तरावर एसआयटी स्थापन करावी. यात विविध राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, सायबर सेलचे पोलीस अधिकारी तसेच समाजातील सायबर तज्ज्ञांचा समावेश करावा. लवकरात लवकर तपास करून मुळ सुत्रधारांचा छडा लावण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

केंद्रानेही करावा शक्ती कायदा

महिलांबाबत अशा प्रकारचे गुन्हे वाढत असल्याने केंद्रीय सायबर विभागाने आरोपीवर स्वतःहून खटला दाखल करावा. तसेच महिलांबाबत बदनामी करणारे सर्व अॅप तत्काळ हटवावेत व त्यावर बंदी आणावी. राज्याच्या शक्ती कायद्याप्रमाणे केंद्रानेही शक्ती कायदा करावा. केंद्र सरकारच्या आयटी विभागाने आवश्यकता असल्यास सीबीआयच्या मदतीने अशा प्रकारच्या सामाजिक अॅप आयोजकांना, स्त्रियांबाबत अपमानास्पद आणि छळवणुकीच्या घटनांचा सर्व डेटा नष्ट करण्यासाठी आवश्यक पाउले ऊचलावीत. सायबर कायद्यातील कलम 66 अ मध्ये विशेष अभ्यास करून महिलांचे सामाजिक माध्यमातून होणारी छळवणूक थांबवावी, अशी मागणी देखील गोऱ्हे यांनी यावेळी केली.

हेही वाचा - Kalicharan Maharaj get Police Custody : कालीचरण बाबाला एक दिवसाची पोलीस कोठडी, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.