ETV Bharat / city

चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या हास्य कलाकाराची महाराष्ट्राला गरज - प्रदीप देशमुख - चंद्रकांत पाटलांवर टीका

पेट्रोल-डिझेलची दरवाढ, सिलिंडरचे वाढलेले दर आणि अन्नपदार्थांची सातत्याने वाढणारी महागाई यामुळे पोळलेल्या जनतेचे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे. ही अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लगावला आहे.

प्रदीप
प्रदीप
author img

By

Published : Oct 26, 2021, 8:04 PM IST

Updated : Oct 26, 2021, 8:16 PM IST

पुणे - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सेन्स ऑफ ह्यूमर अतिशय चांगला असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ, सिलिंडरचे वाढलेले दर आणि अन्नपदार्थांची सातत्याने वाढणारी महागाई यामुळे पोळलेल्या जनतेचे त्यांच्या विधानांमुळे चांगलेच मनोरंजन होत आहे. ही अतिशय उच्च दर्जाची मनोरंजन सेवा असून राज्य सरकारने कृपया त्यांच्या विधानांवर करमणूक कर लावू नये, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी लगावला आहे. जी व्यक्ती आपल्या शहरात जमेना म्हणून सुरक्षित मतदारसंघाचा आधार घेते, त्या व्यक्तीला कुणीही सिरियसली घेत नाही, असेही ते म्हणाले.

'चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या हास्य कलाकाराची महाराष्ट्राला गरज'

'भाजपाच्या नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत'

चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर टिका करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जमेना म्हणून पवार मैदानात उतरले असे विधान केले होते. त्याबाबत बोलताना प्रदिप देशमुख म्हणाले की, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असून कैक प्रयत्नानंतर देखील आघाडीच्या एकजूटीवर आणि सरकारच्या स्थिरतेवर तसूभरही परिणाम होत नाही. यामुळे भाजपाच्या नेते वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यातून सावरण्यासाठी ते बेताल व बेलगाम वक्तव्याचा आधार घेत आहेत, असेही देशमुख म्हणाले.

'पुणे आणि पिंपरी महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार'

उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटने व इतर कार्यक्रम घेण्याचा धडाका लावला आहे. याचा अर्थ तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जमेना म्हणून मोदी प्रचारात उतरले असा घ्यायचा का? शरद पवार आमचे सर्वोच्च नेते असून कार्यकर्त्यांशी ते सातत्याने संपर्कात असते. जनतेशी पवार साहेबांशी असणारे हे बॉण्डींगच भाजपाच्या पोटात धडकी भरविणारे आहे. पवार साहेब, अजितदादा, सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे आणि पिंपरी महापालिकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकणार असून चंद्रकांत पाटील व मंडळींचे चेहरे पाहण्यासारखे होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा - समीर वानखेडे प्रकरण; तपास यंत्रणांवर दबाव निर्माण करणे चुकीचे- प्रवीण दरेकर

Last Updated : Oct 26, 2021, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.