पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पक्षाचा नाव बदलून भारतीय जनता पक्ष लॉन्ड्री अस नाव ठेवलं आहे. यावर त्यांना विचारल असता ते म्हणाले की आता भारतीय जनता लॉन्ड्री मध्ये तो आधी भारतीय जनता पक्ष होता. त्यांच्या आणि आमच्या विचारात वैचारिक मतभेद होते. पण नात्यात कटुता कधीच नव्हती. आता लॉन्ड्री झाली आहे, याचं कारण अनेक पक्षांमध्ये सगळे म्हणजे त्यांचे ओरिजिनलपेक्षा बाहेरचे गेलेले लोक जास्त दिसतात. त्यांच्या कुठल्याही व्यासपीठ बघा, तिथे मला आनंद वाटतो. की भारतीय जनता पक्षाच्या आणि लॉन्ड्रीच्या आता पक्षाच्या व्यासपीठावर. आत्ता आमचे राष्ट्रवादीतून गेलेले, आमचे शिवसेनेतून गेलेले, आमचे काँग्रेसमधून गेलेले, एवढे मोठे नेत्यांना एवढी संधी दिली आहे. त्याबद्दल मी भारतीय जनता लॉन्ड्रीचे आभार मानते. असे यावेळी खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी म्हटले आहे. पुण्यात उरळी देवाची येथे एका कार्यक्रमानिमित्त सुळे आले होते. यावेळी ते बोलत होते.
50% राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत तसेच यावेळी खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाले की, त्यांच्याच काही त्यांच्याबरोबर आता पक्षात राहणारे लोक असे सांगतात. भारतीय जनता पक्षाबरोबर आपण जर गेलो, तर त्यांच्या तर आपल्याला क्लीन चीट मिळते, असे मी म्हणत नाही. असे त्यांचे सांगलीचे खासदार म्हणतात किंवा एक पत्र त्यांच्या एका आमदारांनी लिहिलं होतं की चला आपण सगळे भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो, तर आपल्याला क्लीन चिट मिळेल. आपल्याला कुठल्याही एजन्सीचा त्रास होणार नाही. असे त्यांच्यात गेलेलं लोक म्हणत आहे. आजही त्यांची 103 किंवा 105 जे काय त्यांची आमदार आहेत. ते 50% राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत. आणि आता सत्ता त्यांनी त्यांच्यावर स्थापन केली आहे. ते पण एक फुटलेलाच ग्रुप आहे. त्याच्यामुळे आता त्यांचा पक्ष राहिलाय कुठे ? जे बिचारे कष्ट करणारे भारतीय जनता पक्षाचे लोक होते. ज्यांनी विरोधात संघर्ष के,ला ज्यांनी चटाया उचलल्या, खुर्च्या उचलल्या, माईक लावले, कष्ट केले, पक्षाला एवढा मोठा केलं ते कार्यकर्ते आणि सहकारी ज्यांनी खरंच भारतीय जनता पार्टी वाढवली. ते आज कुठेच तुम्हाला दिसत नाहीत. आज नवीन चेहरे दिसतात, पण मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आमच्याकडून गेलेल्यांचा एवढा मान सन्मान होतोय, अस देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी सांगितले आहे.
भाजपने एक टॅग लाईन वापरली सत्तेत असताना भाजपने एक टॅग लाईन वापरली होती. ती म्हणजे पुणे बदलतय यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टिका केली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की नक्कीच पुणे हे बदलत चालला आहे. पुण्यात कचरा फ्लडींग कधीच नव्हत, ते आत्ता व्हायला लागलं आहे. तसेच आत्ता रस्ते तुंबायला लागले आहे. ठिकठिकाणी कचरा पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांनी जी टॅग लाईन वापरली होती. तो योग्यच होती, असा टोला देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे MP Supriya Sule यांनी लगावला आहे.
किती गैरसोय सर्वसामान्य जनतेची पुण्यात पावसाच्या पाण्याने जे पाणी तुंबत आहे. त्यावर सुळे म्हणाले की, ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षांमध्ये कचऱ्याचा पाण्याचा 24/7 पाणी देऊ अशी घोषणा केली होती. तुम्ही बघता या भागामध्ये पाण्याचे किती अडचणी आहे. त्यामुळे अर्थातच गेल्या पाच वर्षांमध्ये पालिकेने जे काम केलंय किंवा जे काही नियोजन त्यांनी केले. तुम्ही बघताय आता काय परिस्थिती आणि काय भयानक परिस्थिती पुण्याची झालेली आहे. पुणे एक शिक्षणाचा माहेरघर नाही, पण एक बेटर कॉलिटी ऑफ लाइफसाठी लोक इथे आवर्जून राहिला यायचे. अशा सुंदर आपल्या पुण्यामध्ये जे हरित पुणे होतं, सुरक्षित पुणे होतं. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने पाणी तुमत आहे. किती गैरसोय सर्वसामान्य जनतेची होत आहे. पुणेकरांना फार अडचणी टाकण्याचा पाप गेल्या पाच वर्षात या सगळ्यांनी केल आहे. असे देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितल आहे. तसेच पाच वर्षांमध्ये काय हाल पुण्याचे झालेले आहे. हे आपण पाहत आहोत. पुण्याचा म्हणजे पुण्यामध्ये गाडीतून निघताना एकवेळ मुंबई गाठण सोप आहे, पण पुण्यात फिरणं अशक्य असं दुर्दैवी परिस्थिती पुण्याची झाली आहे, अस देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीबाबत सुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला खूप दुर्दैवी वाटतात. कारण अनेकवेळा खरंतर महाराष्ट्रात आपण सगळ्यांनीच पाहिलेले आहेत. एखाद्या कुटुंबातला करता पुरुष जेव्हा जातो आणि जर त्याची बायको केव्हा त्याच्या कुटुंबातलं कोणी लढू इच्छित असेल, तर मला वाटते इतक्या टोकाची स्टॅन्ड घेणं हे मला योग्य वाटत नाही. मराठी आणि भारतीय संस्कृतीत पण बसत नाही, असे देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने राष्ट्रवादीवर टीका करत आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता ते म्हणाले की मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असू दे किंवा देशाचे अध्यक्ष असू दे हे सगळे दडपशाही, दमदाटी करत आहे. भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी भाषण केलं होतं. की एक देश एक पक्ष त्याच्यामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं, त्या संविधानामध्ये एक देश अनेक पक्ष आणि विरोधक हा असलाच पाहिजे, ही भूमिका भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातच लिहून ठेवल आहे. पण हे ज्या पद्धतीने बोलत आहे. ते भारतीय संस्कृतीला न शोभणारे आहे. असे देखील यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.