पुणे - नवाब मलिक यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाविषयाचे केलेले वक्तव्य हे पक्षाचे मत नाही. अण्णांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी स्पष्ट केले. ६ दिवस होऊनही राज्य सरकार अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दखल घेत नाही याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुण्यात आंदोलन केले.
शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले, अण्णा हजारे ज्या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत त्याच मागण्यांवर हे सरकार निवडून आले आहे. त्याच पक्षाचे पंतप्रधान अण्णांनी पाठवलेल्या पत्राला शुभेच्छा म्हणून उत्तर पाठवतात. या सरकारने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर हे सरकार दबाव टाकत आहे. भारतीय लोकशाहीवर घाला घालण्याचे काम या सरकारकडून सुरू असल्याची टीका तुपे यांनी केली.