ETV Bharat / city

NCP Agitation Pune : पुण्यात महागाई आणि वीज दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ( NCP agitation against Central and State Governments Pune ) आंदोलन करण्यात आले. यावेळी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी नावाचे मुखवटे घालून तरुणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

आंदोलन
आंदोलन
author img

By

Published : Jul 11, 2022, 3:03 PM IST

Updated : Jul 11, 2022, 3:12 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 50 गॅस दरवाढ आणि राज्यातील शिंदे सरकारने वीज दरवाढ, जेवणावर 5 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज ( सोमवारी ) पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ( NCP Pune agitation ) आंदोलन करण्यात आले. यावेळी गरिबी, महागाई आणि बेरोजगारी नावाचे मुखवटे घालून तरुणी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. केंद्र आणि राज्य सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष

केंद्र आणि राज्य सरकारवर टीका : मागील 75 वर्षातील सर्वात मोठी महागाई केंद्र सरकारने केली आहे. सतत पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढ करून सर्व सामान्यांचे जगणे मुश्किल आहे. त्यामुळे आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहोत. श्रीलंकामध्ये महागाईमुळे काय परिस्थिती झाली आहे. हे पाहून तरी केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात आणावी अन्यथा आपल्याकडे देखील अशी परिस्थिती होऊ शकते, अशा शब्दात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केंद्र सरकारला टोला लगावला. राज्यात एकनाथ शिंदे यांच सरकार येऊन काही तास होत नाही. तोवर वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील ईडी सरकारला सत्ता स्थापन करताना जो काही खर्च झाला. त्याची वसुली सर्व सामान्य जनतेच्या वीज दरवाढीमधून करायची, हे स्पष्ट झाले असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.

हेही वाचा - Goa Political Crisis : काँग्रेसचे बंड रोखण्यासाठी मुकुल वासनिक आज गोव्यात दाखल होणार

Last Updated : Jul 11, 2022, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.