ETV Bharat / city

Nawab Malik on Sharad Pawar ED Notice : 'शरद पवार यांना ईडी कार्यालयात जाण्याचा सल्ला मीच दिला होता' - ED notice to Sharad Pawar

शरद पवार यांना 'ईडी'च्या कार्यालयात जाण्याची घोषणा करण्याचा सल्ला मीच दिला होता, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. शहरातील आझम कॅम्पसयेथे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने नवाब मलिक यांचा भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

Nawab Malik
नवाब मलिक
author img

By

Published : Dec 4, 2021, 10:11 AM IST

पुणे - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना नोटीस ( ED Notice to Sharad Pawar ) पाठवली होती. त्यानंतर पवार यांना 'ईडी'च्या कार्यालयात जाण्याची घोषणा करण्याचा सल्ला मीच दिला होता, (Nawab Malik Advice to Sharad Pawar ) असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक ( Minority Development Minister Nawab Malik ) यांनी केला आहे. शहरातील आझम कॅम्पसयेथे महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांच्या वतीने नवाब मलिक यांचा भव्य सत्कार (Grand Reception of Nawab Malik ) करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

Grand reception of Nawab Malik
नवाब मलिक यांचा भव्य सत्कार

सर्व यंत्रणांना उघडे पडण्याचे काम केलं -

भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणांना ( Central Investigation Agency ) हाताशी धरून सूडबुद्धीने अनेकांवर कारवाई होत आहे. या सत्कार समारंभास संबोधित करतांना मलिक म्हणाले, सरकारच्या स्थापनेपासून भाजपाकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांची ( Leader of Mahavikas Aaghadi ) बदनामी व खोटे आरोप करत प्रतिमा मलिन करण्याचे कटकारस्थान सुरू असून या सर्व यंत्रणांना उघडे पडण्याचे काम पवार साहेबांचा शिलेदार म्हणून मी पार पाडली. या लढाईमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांची भूमिका व प्रेम प्रेरणादायी आहे. महाविकास आघाडीच्या वतीने माझा जो सम्मान केला, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कार्यकर्त्यांमुळे लढण्याची ऊर्जा मिळते -

नवाब मलिक आक्रमक भूमिका घेत भाजपाला सडेतोड उत्तर देत आहेत. महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना यामुळे लढण्याची ऊर्जा मिळत आहे, अशी भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. या सत्कार सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभयजी छाजेड, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार सुनील टिंगरे आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.