ETV Bharat / city

पुण्यात व्याजाच्या पैशावरून सराईत गुन्हेगाराचा खून, तिघांना अटक - पुणे पोलीस बातमी

पोलिसांनी याप्रकरणी लतिफ बाबू शेख (वय 43), शुभम प्रमोद कासवेकर (वय 24) आणि शुभम संतोष उबाळे (वय 22) या तिघांना अटक केली. यातील मृत व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बारा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

pune crime
पुण्यात व्याजाच्या पैशावरून सराईत गुन्हेगाराचा खून
author img

By

Published : Jul 17, 2020, 1:54 AM IST

पुणे - 50 लाखांच्या मोबदल्यात दोन कोटी देऊनही आणखी 80 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सावकाराची पुण्यात निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यातील कोंढवा परिसरात 11 जुलै रोजी हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली. घनश्याम उर्फ पप्पू पडवळ (वय 51) असे खून झालेल्याचे नाव आहे.

विनायक गायकवाड पोलीस निरीक्षक

पोलिसांनी याप्रकरणी लतिफ बाबू शेख (वय 43), शुभम प्रमोद कासवेकर (वय 24) आणि शुभम संतोष उबाळे (वय 22) या तिघांना अटक केली. यातील मृत व्यक्ती हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बारा गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लतीफ शेख याने पप्पू पडवळ त्याच्याकडून चार वर्षापूर्वी व्याजाने पन्नास लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्याला आतापर्यंत दोन कोटी रुपये दिले होते. परंतु पप्पू पडवळ त्याच्याकडे आणखी 80 लाख रुपये मागत होता आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे लतीफ याने पप्पू पडवळ याला ठार मारण्याचा कट रचला. लतीफ शेख याची आई आजारी असताना एका मौलवीने दिलेल्या औषधामुळे ती बरी झाली होती. ही माहिती त्याने पप्पू पडवळला दिली होती. पडवळ हासुद्धा आजारी पडत असल्यामुळे त्याने मौलवीला घेऊन लतिफ याला घरी बोलवले होते. हीच संधी साधून लतिफने पप्पू पडवळला मारण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने इतर दोघा आरोपींना दहा लाख रुपये देण्याचे आमीष दाखवून आपल्यासोबत घेतले. नऊ जुलैच्या रात्री लतिफ शेख याने इतर दोघा आरोपींना मौलवी म्हणून पडवळच्या फ्लॅटमध्ये नेले. त्यानंतर तिघांनी मिळून पडवळ याच्यावर कोयत्याने 50 ते 55 वार करत त्याची निर्घूण हत्या केली. आरोपींनी कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता.

पडवळाच्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआरही ते घेऊन गेले होते. दरम्यान, दोन दिवसानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना लतिफ याने पप्पू पडवळ यांच्याकडून पन्नास लाख रुपयाचे कर्ज घेतले असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला विचारणा केली असता, त्यांने दिलेल्या माहितीत विसंगती आढळली. पोलिसांनी पुन्हा त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. लतिफने पडवळला पन्नास लाखाच्या बदल्यात दोन कोटी देऊनही तो आणखी 80 लाख मागत होता. तसेच लतिफ राहत असलेला फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी दबाव टाकत होता. लतिफ शेख यांच्या घरातील महिलांविषयी वाईट बोलत होता. त्यामुळे हा खून केल्याचे त्याने सांगितले. कोंढवा पोलिसांनी अतिशय शिताफीने गुन्ह्याचा तपास करत आरोपींना अटक केली. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक महादेव कुंभार करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.