ETV Bharat / city

Salman Khan Death Threat : सलमान खानला आलेल्या धमकीचे बिष्णोई गँगशी संबंध असल्याचे उघड, मुंबई पोलिसांची माहिती

सलमान खानच्या घराबाहेर ( Salman Khan Death Threat Letter ) धमकीचं पत्र मिळाल्याचं प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम ( Mumbai Crime Branch Enter In Pune ) पुण्यात दाखल झाली आहे. दरम्यान धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी सौरभ महाकाल नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत असून, त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Salman Khan Death Threat
Salman Khan Death Threat
author img

By

Published : Jun 9, 2022, 7:05 PM IST

Updated : Jun 10, 2022, 7:37 AM IST

पुणे - बॉलिवूड स्टार सलमान खानच्या घराबाहेर ( Salman Khan Death Threat Letter ) धमकीचं पत्र मिळाल्याचं प्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम ( Mumbai Crime Branch Enter In Pune ) पुण्यात दाखल झाली आहे. दरम्यान धमकीचे पत्र मिळाल्याप्रकरणी सौरभ महाकाल नावाच्या व्यक्तीचं नाव पुढे येत असून, त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या चौकशीत या पत्राचे संपूर्ण सत्य समोर आले आहे. बुधवारी मोठी कारवाई करत पुणे ग्रामीण पोलिसांनी फरार सौरभ महाकाल याला मोक्का अंतर्गत अटक केली.

प्रतिक्रिया

या आरोपीचे तार पंजाबी गायक सिद्धू मुसावाला ( Siddhu Moosewala Murder Case ) यांच्या हत्येशी संबंधित आहेत. आता त्याची चौकशी सुरू आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येत त्याचा काही हात होता की नाही हे सध्या तरी कळू शकलेले नाही. पण आता अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो. दुसरीकडे, सलीम खान आणि अभिनेता सलमान खान यांना धमकीची पत्रे मिळाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा बुधवारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी दिल्लीत गेली होती. तसेच मुंबई पोलिसांनी सलीम खान आणि सलमान खानचे जबाब नोंदवले असून सलमान खानच्या वांद्रे येथील घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी सलमानच्या दोन अंगरक्षकांचे जबाबही नोंदवले आहेत. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची 29 मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर सलमान खानला धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती.

बिष्णोई गँगशी संबंध - सलमान खानला पाच जून रोजी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून राजस्थानमधील व्यक्तीने धमकीचे पत्र सलमान खान पर्यंत पोहोचले असल्याची माहिती मुंबई पोलिस दलातील सूत्रांकडून मिळाली आहे. गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड यानेच हे धमकीचे पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचवले होते अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक या प्रकरणी तपास करत आहे. विक्रम बराडवर आतापर्यंत 24 पेक्षाही जास्त गुन्हे दाखल आहेत. तो राजस्थानच्या हनुमानगढ येथील रहिवासी आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा प्रसिद्धी स्टंट - बॉलीवूड स्टार सलमान खानला आलेले धमकीचे पत्र हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा प्रसिद्धी स्टंट असल्याचे मुंबई पोलिसांनी गुरुवारी सांगितले. सध्या कॅनडामध्ये वास्तव्यास असलेल्या बिष्णोईचा सहकारी विक्रम बरड याच्या सांगण्यावरून ही धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे पत्र देण्यासाठी तीन जण मुंबईत आले होते. त्यांनी सौरभ महाकाळची कल्याणमध्ये भेट घेतली होती. मुंबई गुन्हे शाखेच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. सलमान खानला दिलेल्या धमकीच्या पत्रामागे विक्रम बरड प्रमूख भूमिका असल्याचे चौकशीत समोर आले आहे. बरड हा राजस्थानातील हनुमानगड येथील रहिवासी आहे. त्याच्यावर दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - Dipali Sayyed slammed BJP : संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेतो, भाजपच्या मोठाभाईला माफी मागायला सांगा- दिपाली सय्यद

Last Updated : Jun 10, 2022, 7:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.