ETV Bharat / city

आहे त्याच जीएसटीत राज्य कॉम्पन्सेन्ट होत नाहीये, केंद्रानं पहिलं प्रपोझल द्यावं - सुप्रिया सुळे

परसेप्शन आणि रियालिटीमध्ये फरक आहे. केंद्राने पहिले त्यांची संपूर्ण भूमिका जाहीर करावी. तसेच केंद्र सरकार हे राज्यातील अधिकारात ढवळाढवळी करत असते, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

MP Supriya Sule
खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Sep 17, 2021, 5:46 PM IST

Updated : Sep 17, 2021, 7:46 PM IST

पुणे - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची लखनौ येथे बैठक होत आहे. या बैठकीमध्ये पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासंदर्भातील महत्वाच्या निर्णयावर चर्चा होणार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे

परसेप्शन आणि रियालिटीमध्ये फरक आहे. केंद्राने पहिले त्यांची संपूर्ण भूमिका जाहीर करावी. आज सगळ्या कोर्पोरेटीव्ह फेडरॅलिझमबद्दल केंद्र सरकार सातत्याने बोल्ट असते. पण राज्यातील अधिकारात ते ढवळाढवळी करत असतात. म्हणून त्यांनी पहिले प्रपोझल तर पाठवावं. आहे त्याच जीएसटीत राज्य कॉम्पन्सेन्ट होत नाहीये, असं मत यावेळी सुळे यांनी व्यक्त केलं आहे.

  • निंदकाचे घर असावं शेजारी -

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे दररोज मॉनेटरिंग करत आहेत. सध्या महिला आयोग नियुक्ती नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि दिलीप वळसे पाटील हे महिला अत्याचारांच्या घटनांवर स्वतः लक्ष ठेवून आहेत हे महत्वाचे आहे. चित्रा वाघ या वारंवार टीका करत आहेत यावर सुळे म्हणाल्या, निंदकाचे घर असावं शेजारी. माझ्यावर माझ्या आईचे संस्कार आहेत. विरोधकांनी मनमोकळेपणाने आमच्यावर टीका करावी आम्ही जनतेची सेवा करू.

  • तुम जियो हजारो साल... साल के दिन हो पचास हजार -

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातील विविध नेत्यांनी तसेच विरोधकांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी अनोख्या अंदाजात शुभेच्छा देत 'तुम जियो हजारो साल... साल के दिन हो पचास हजार' असं म्हटलं आहे.

हेही वाचा - गणेश विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार

Last Updated : Sep 17, 2021, 7:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.