पुणे - पुणे महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले ( Pune Municipal Corporation Election ) आहे. राज्य निवडणूक आयोगाने ( State Election Commission ) १ फेब्रुवारीला प्रभाग रचना जाहीर केली होती. त्यानुसार पुण्यात आता एकूण ५८ प्रभाग असणार असून प्रत्येक प्रभागात ३ नगरसेवक असणार आहेत. म्हणजेच जो प्रभाग पूर्वी ४ नगरसेवकांचा होता तो आता तीन नगरसेवकांचा असणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर याबाबत हरकती नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगाने १४ दिवसांची मुदत दिली होती. १४ फेब्रुवारी ही हरकती नोंदविण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवसांपर्यंत सुमारे ३ हजार ५९६ हरकती आल्याचे समोर आले आहे. यावर २ मार्च रोजी निर्णय घेण्यात येणार आहे.
सर्वाधिक हरकती वानवडीतून - ३ हजार ५९६ हरकतींपैकी सर्वात जास्त म्हणजेच सुमारे एक हजार हरकती वानवडी येथून नोंदविण्यात आले आहेत. सर्वात कमी हरकती या शिवाजी नगर भागातील घोले पाटील रोड या क्षेत्रीय कार्यालयातून आल्या आहेत.
भाजपने केला हा आरोप - पुणे महापालिकेची येणारी निवडणूक ही तीन सदस्य संख्येची असणार आहे. ही प्रभाग रचना आपल्या सोईची असावी यासाठी अनेक राजकीय पक्षांनी आपली ताकत लावली होती. पण, प्रभाग हे खूप वेगळ्या पद्धतीने झाले असून महापालिकेने निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार प्रभाग केले नाहीत, असा आरोप भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी केला आहे.
असे आहेत पुणे महापालिकेचे ५८ प्रभाग
1. धानोरी - विश्रांतवाडी
2. टिंगरेनगर - संजय पार्क
3. लोहगाव - विमान नगर
4. वाघोली - इऑन आयटी पार्क
5. खराडी - चंदननगर
6. वडगावशेरी
7. कल्याणीनगर - नागपूर चाळ
8. कळस - फुलेनगर
9. येरवडा
10. शिवाजीनगर गावठाण - संगमवाडी
11. बोपोडी - पुणे विद्यापीठ
12. औंध - बालेवाडी
13. बाणेर - सुस म्हाळुंगे
14. पाषाण - बावधन बुद्रुक
15. पंचवटी - गोखलेनगर
16. फर्ग्युसन कॉलेज - एरंडवणे
17. शनिवार पेठ - राजेंद्रनगर
18. शनिवार वाडा - कसबा पेठ
19. रास्तापेठ - के.ई.एम. हॉस्पिटल
20. पुणे स्टेशन - ताडीवाला रोड
21. मुंढवा - घोरपडी
22. मांजरी - शेवाळवाडी
23. साडेसतरानळी - आकाशवाणी
24. मगरपट्टा - साधना विद्यालय
25. हडपसर गावठाण - सातववाडी
26. भीमनगर - रामटेकडी
27. कासेवाडी - हरकानगर
28. महात्मा फुले स्मारक - टिंबर मार्केट
29. खडकमाळ आळी - महात्मा फुले मंडई
30. जयभवानी नगर - केळेवाडी
31. कोथरूड गावठाण - शिवतीर्थ नगर
32. भुसारी कॉलनी - सुतारदरा
33. बावधन खुर्द - महात्मा सोसायटी
34. वारजे - कोंढवे धावडे
35. रामनगर - उत्तमनगर शिवणे
36. कर्वेनगर
37. जनता वसाहत - दत्तवाडी
38. शिवदर्शन - पद्मावती
39. मार्केटयार्ड - महर्षी नगर
40. गंगाधाम - सॅलीसबरी पार्क
41. कोंढवा खुर्द - मिठानगर
42. सय्यदनगर - लुल्लानगर
43. वानवडी - कौसरबाग
44. काळेपडळ - ससाणेनगर
45. फुरसुंगी
46. मोहम्मदवाडी - उरुळी देवाची
47. कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी
48. अप्पर सुपर इंदिरानगर
49. बालाजीनगर - के के मार्केट
50. सहकारनगर - तळजाई
51. वडगाव - पाचगाव पर्वती
52. नांदेडसिटी - सनसिटी
53. खडकवासला -नऱ्हे
54. धायरी - आंबेगाव
55. धनकवडी - आंबेगाव पठार
56. चैतन्यनगर - भारती विद्यापीठ
57. सुखसागर नगर - राजीव गांधी नगर
58. कात्रज - गोकुळनगर