पुणे - कोरोनाच्या सुरूवातीच्या काळापासून देशात हॉटस्पॉट अशी ओळख असलेल्या पुणे शहरात मागच्यावर्षी कोरोनाने 4500 हजार नागरिकांचा मृत्यू झाला होता तर यंदाच्या वर्षी 5 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे.राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही लाटेत मोठ्या प्रमाणात राज्यात पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण हे आढळून आले आहेत.या वर्षी शहरातील 13 क्षेत्रीय कार्यालयापैकी सर्वाधिक हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या तीत 1083 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.
क्षेत्रीय कार्यालयानिहाय मृत्यू -
पुणे शहरातील औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 316 भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालयाच्या हद्दीत 568 भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 547 धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 813 ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 289 हडपसर मुंडवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक 1083 कसबा विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 835 कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 446 कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 479 नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाचे हद्दीत 681 शिवाजिनगर घोले रोड क्षेत्रिया कर्यालयाच्या हद्दीत 423 सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 423 वानवडी रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 434 वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 531 आणि कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 729 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे.
त्या कुटुंबियांना महापौरांकडून अनोखे आधार
कोरोनाच्या महामारी ने घरातील व्यक्तीला हिरावून नेल्याने अंधारमय झालेल्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आणि अंधारातून प्रकाशाकडे येण्याची प्रेरणा देण्यासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्या कुटुंबीयांना दिवाळी फराळ भेट देऊन सात्वन पर संवाद साधण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आहे.या उपक्रमाद्वारे प्रत्येक कुटुंबास दिवाळी फराळ देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत जवळपास पाच हजार कुटुंबांना भेट देऊन सांत्वन पर संवाद आणि फराळ देण्यात येणार आहे.यासाठी 16 टीम तयार करण्यात आले आहेत. गतवर्षीही महापौरांतर्फे साडेचार हजार कुटुंबीयांना फराळ भेट देण्यात आल होत.
म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आलं -
शहराचा प्रथम नागरिक या नात्याने कोरोनाच्या साथी मध्ये दुर्देवी मृत्यू झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.दीपावलीच्या हा उत्सव आपल्या परंपरेचा भाग आहे. ही परंपरा त्या कुटुंबीयांनाही जगता यावे आणि दुःख मागे सारून नव्याने आयुष्याची घडी बसविण्यासाठी आधार मिळावा शिवाय ही घडी बसवताना तुम्ही एकटे नाही ही भावना ही त्या कुटुंबीयांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अस
या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.