पुणे - मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निर्णयाला विरोध दर्शवणाऱ्याला मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना चांगलेच भोवले आहे. त्यांना शहराध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले ( MNS Vasant More Removed President ) आहे. त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली ( Sainath Babar Pune President ) आहे. त्यानंतर आता वसंत मोरे यांनी एक पोस्ट चर्चेत आली ( Vasant More Social Media Post ) आहे.
वसंत मोरे यांनी नवे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नियुक्तीबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले की, 'अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे. कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन,' अशी पोस्ट करत त्यांना शहराध्यक्ष नियुक्तीबाबत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
"अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS
">"अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS"अरे मी तर कधीपासूनच तुझा मावळा आहे " कार्यक्षम नगरसेवक मनसेचे गटनेते साईनाथ बाबर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड!
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 7, 2022
खूप खूप अभिनंदन साई!@Sainathbabar7 pic.twitter.com/Qkar8mCakS
राज ठाकरेंच्या आदेशाला नकार - राज्य सरकारकडून मशिदीवरील भोंगे काढण्याची कारवाई होणे अपेक्षित आहे. जर काढले नाहीत, तर त्याला मशिदीसमोर हनुमान चालीसा द्वारे प्रत्युत्तर द्या, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यावर माझ्या प्रभागात मुस्लीम मतदार आहेत. त्यांच्याकडून तुम्ही काय भूमिका घेणार, असे मला विचारले जात आहे. त्यामुळे हा विषय माझ्यासाठी अडचणीचा ठरत असल्याने माझ्या भागात मशिदीवरील भोंगे यांच्याविरोधात हनुमान चालीसाचे भोंगे लावले जाणार नाहीत, अशी भूमिका वसंत मोरे यांनी स्पष्ट केली होती.
साईनाथ बाबर यांची नियुक्ती -
पुण्यातील नाराजी नाट्यानंतर राज ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणावर नाराजी व्यक्त करणाऱ्या वसंत मोरेंना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यानंतर वसंत मोरेंची पुणे मनसे शहरअध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. साईनाथ बाबर यांची पुणे शहरअध्यक्ष पदी निवड केल्याचे पत्र राज ठाकरेंनी दिले आहे.
'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा,' असे नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक श्री. साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या जबाबदारीसाठी श्री. साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा! pic.twitter.com/Egqw962ZIx
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 7, 2022
राज ठाकरे काय म्हणाले होते? - शिवाजी पार्कवरती बोलताना राज ठाकरे म्हणाले होते की, मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असे युरोपातील शासन आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.