ETV Bharat / city

महाराष्ट्रात फक्त मराठीच..! कर्वेनगरच्या उड्डाणपुलावरील हिंदी सुविचाराला मनसेने फासले काळे - mns protest against hindi

कर्वेनगर येथील उड्डाणपुलाला लिलिलेल्या हिंदी भाषेततील सुविचाराला काळे फासून निषेध केला. तसेच महानगरपालिकेने कामकाजात अधिकृतपणे हिंदी भाषा वापरण्याचा एखादा नवा कायदा केला आहे का.? की हळू हळू हिंदी भाषा किंवा इतर कोणतीही परप्रांतीय भाषा पुणेकरांच्या माथी मारून ती मनावर बिंबवण्याचा काही कावा सत्ताधाऱ्यांनी आखला आहे? असा सवालही मनसेने उपस्थित केला.

mns protest
महाराष्ट्रात फक्त मराठीच..!
author img

By

Published : Mar 13, 2021, 11:01 AM IST

पुणे - कोथरूड मधील कर्वेनगर चौकातील कै. नानासाहेब बराटे उड्डाणपुलाला सुशोभीकरणच्या नावाखाली हिंदी भाषेत संदेश लिहिण्यात आले आहेत. यावर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेने कामकाजात अधिकृतपणे हिंदी भाषा वापरण्याचा एखादा नवा कायदा केला आहे का.? की हळू हळू हिंदी भाषा किंवा इतर कोणतीही परप्रांतीय भाषा पुणेकरांच्या माथी मारून ती मनावर बिंबवण्याचा काही कावा सत्ताधाऱ्यांनी आखला आहे? असा सवाल केला. तसेच मनपाच्या या कृतीचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या उड्डाणपुलावर हिंदीत लहिलेल्या संदेशाला काळे फासण्यात आले.

महाराष्ट्रात फक्त मराठीच..!
महाराष्ट्रात फक्त मराठीच..!

महाराष्ट्रात फक्त मराठीच-

पुणे शहरात भिंती सुशोभीकरणाचे काम सध्या शहरातील विविध भागात सुरू आहे. सुशोभीकरणाच्या देण्यात येणाऱ्या संदेश हे हिंदीत दिले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात हिंदी भाषेचा अतिरेक महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कधीही सहन करणार नाही. पुणेकरांवर जबरदस्तीने लादलेल्या हिंदी भाषेचा आम्ही जाहीर विरोध आणि निषेधही करतो. "महाराष्ट्रात आणि त्यात पुण्यात तर फक्त मराठीच" हा मराठी भाषेच्या, मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे. यामध्ये राजसाहेबांच्या आदेशाने मनसे खंबीरपणे मराठी माणसाच्या व मराठी भाषेच्या बाजूनेच उभी असेल, असा संदेशच मनसेने प्रशासनास दिला.

महाराष्ट्रात फक्त मराठीच..!

सुविचारांना फासले काळे-

उड्डान पुलावर हिंदी भाषेतून लिहण्यात आलेल्या सुविचारांना काळे फासून मनसेच्या कोथरूड विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कर्वेनगर येथील स्थानिक महाराष्ट्र सैनिक संतोष वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उड्डाणपुलावर हे आंदोलन करण्यात आले.

वॉर्ड ऑफिसला देण्यात आलं निवेदन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कोथरूड येथील वॉर्ड ऑफिसला याबाबत निवेदन देण्यात आले आहे. तसेच हिंदीतून सुविचार लिहण्याच्या सुचना देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर याविषयी कारवाई करण्याचे आश्वासन देखील वार्ड अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच भविष्यात जर मराठीला डावलण्यात आले तर मनसेतर्फे मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसेने दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.