ETV Bharat / city

तळजाई जैवविविधता प्रकल्पाला मनसेचा विरोध, राज ठाकरे उतरणार मैदानात - तळजाई प्रकल्पाला मनसेचा विरोध

सहकार भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकरच्या जागेवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा आराखडा पुणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर केला आहे. या प्रकल्पामुळे परिसराची जैवविविधता नष्ट होऊ शकते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पला विरोध आहे. या साठी नागरिकांचे 'तळजाई बचाव अभियान 'सुरु झाले आहे. त्याला समर्थन देण्यासाठी मनसेने हे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.

MNS opposes Taljai biodiversity project
तळजाई जैवविविधता प्रकल्पाला मनसेचा विरोध
author img

By

Published : Oct 10, 2021, 2:10 PM IST

पुणे - तळजाई टेकडीवरील प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात २४ ऑक्टोबर २०२१ रोजी पुण्यात आंदोलन करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माहिती दिली.

महापालिका तळजाई टेकडीवर उभारणार जैवविविधता वसुंधरा प्रकल्प

सहकार भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे 107 एकरच्या जागेवर जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा आराखडा पुणे महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा आराखडा मंजुरीसाठी स्थायी समितीला सादर केला आहे. या प्रकल्पामुळे परिसराची जैवविविधता नष्ट होऊ शकते, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. यासाठी नागरिकांचे 'तळजाई बचाव अभियान 'सुरु झाले आहे. त्याला समर्थन देण्यासाठी मनसेने हे आंदोलन करण्याचे निश्चित केले आहे.

राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या २४ ऑक्टोबरला आंदोलन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात येत्या २४ ऑक्टोबर रोजी हे आंदोलन होणार आहे. सकाळी 7 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार असल्याची माहिती मोरे यांनी दिली.

राज ठाकरे यांची पुणे महापालिका निवडणुकीची तयारी

राज ठाकरे यांनी शनिवारी पुणे दौरा केला होता. यावेली त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून विविध मतदार संघाचा आढावा घेतला. मनसे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. राज यांनी पुणे दौऱ्यात कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी काही सूचना केल्या आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सर्व शाखा अध्यक्षांना नेमणूक पत्र वाटप केले. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शहर संघटक, शहर सचिव आणि विभाग सचिव उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.