ETV Bharat / city

Rupali Patil Thombare Resigned : राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याआधीच रूपाली पाटील यांचा राजीनामा

मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thombare Resigned ) यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नेते अनिल शिदोरे ( Anil Shidore ) यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे.

Rupali Patil
माजी महिला अध्यक्ष रूपाली पाटील
author img

By

Published : Dec 14, 2021, 11:52 PM IST

पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena Chief Raj Thackeray ) यांच्या पुणे दौऱ्याआधीच मनसेला ( Raj Thackeray Pune tour ) जबर धक्का बसला आहे. मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे ( Rupali Patil Thombare Resigned ) यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नेते अनिल शिदोरे ( Anil Shidore ) यांच्याकडे राजीनामा देण्यात आला आहे.

Rupali Patil
माजी महिला अध्यक्ष रूपाली पाटील

पक्षातील काही लोकांवर होत्या नाराज -

गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्या रुपाली पाटील हे पक्षातील काही लोकांवर नाराज असल्याची माहिती आहे. त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी देखील जाहीर केली होती. मात्र त्यानंतर रुपाली पाटील यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमाला देखील हजेरी लावली नव्हती. पाटील यांची नाराजी दूर होईल असं सांगितलं जातं असताना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला राजीनामा दिल्याने पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. लवकर रुपाली पाटील नवीन पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे असं देखील सांगितलं जातं आहे.

काय लिहिलं आहे पत्रात -

मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत ( Rupali Patil Letter to Anil Shidore ) आहे. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देते. यापुढेही आपले आशीर्वाद व राज ठाकरे हे नाव ह्रदयात कायम कोरलेले राहिल, असे राजीनामा पत्रात रुपाली पाटील ठोंबरे यांनी नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.