ETV Bharat / city

'महाराष्ट्रात आल्यावर रोड टेस्टला आमदारांना सामोरे जावे लागणार'- सचिन अहिर - पुणे

ज्या लोकांनी बंड केल आहे, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आजाराचा फायदा घेतला आहे. उद्या फलोर टेस्टमध्ये काय होईल ते होईल, पण जेव्हा या आमदारांचा रोड टेस्ट होईल तेव्हा त्यांचा सामना शिवसैनिकांशी होईल असा इशारा यावेळी शिवसेना उपनेते सचिन आहीर यांनी दिला आहे.

Sachin Ahir Mla
सचिन अहिर
author img

By

Published : Jun 27, 2022, 9:41 AM IST

पुणे - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यातील शिवसैनिक हे आक्रमक झाले आहेत. राज्यभर आंदोलन करत आहेत.अश्यातच शिवसेनेकडून (Shiv Sena) मेळाव्याचे आयोजन करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टिका केली जात आहे. ज्या लोकांनी बंड केल आहे, त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या आजाराचा फायदा घेतला आहे. उद्या फलोर टेस्टमध्ये काय होईल ते होईल, पण जेव्हा या आमदारांचा रोड टेस्ट होईल तेव्हा त्यांचा सामना शिवसैनिकांशी होईल असा इशारा यावेळी शिवसेना उपनेते सचिन आहीर यांनी दिला आहे.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात (Pune Lok Sabha Constituency) शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा मेळावा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, प्रशांत बधे, पल्लवी जावळे, बाळा ओसवाल, अविनाश साळवे उपस्थित होते.

सध्या महाराष्ट्रातील वारकरी पंढरीच्या वाटेवर आहेत. आणि दुर्दैवाने काही जण वेगळी भूमिका घेऊन सुरत आणि काही मंडळींनी घर तोडण्याचे काम केले. काही काळ उत्साह दाखविणाऱ्या या बंडखोर आमदारांच्या नशिबी निरुत्साह आल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनमानसात लोकप्रिय ठरलेले आणि महाराष्ट्राच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. हे कुणी नाकारू शकणार नाही. 'गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वाधिक निधी मतदारसंघात आणला म्हणून फ्लेक्स लावणारे 'आम्हाला निधी मिळत नाही' असे आरोप कसे करू शकतात, असा प्रश्नही यावेळी आहीर यांनी उपस्थित केला आहे.

बारणे साहेब कुठे जात असाल तर कृपया सांगून. काही वेळापूर्वी वारीत असल्याने माझा फोन नॉट रिचेबल होता, तेव्हा मला पक्षातून दहा फोन येऊन गेले, असेही यावेळी अहिर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा- Shivsenas rebel of MLAs petition : एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेनेची लढाई सर्वोच्च न्यायालयात, दोन दिग्गज वकील मांडणार बाजू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.