ETV Bharat / city

Sharad Pawar Reaction on ED Notice : मलासुद्धा ईडी, इन्कम टॅक्सचे प्रेमपत्र; 2004 सालापासूनचे मागितले डिटेल्स - शरद पवार - Order of senior BJP leaders

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा ( CM Uddhav Thackeray resigns ) दिल्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांनी एकत्र येऊन नवीन सरकार स्थापन ( New Government ) केले. विशेषतः भाजपने संख्याबळ जास्त असतानाही शिंदे यांना मुख्यमंत्री ( New CM Eknath Shinde ) केले. यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार ( NCP chief Sharad Pawar ) यांनी पुण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना संबोधित करताना, बंडखोर आमदारांना उद्देशून सांगितले की, आमदार हा पाच वर्षासाठी ( MLA for Five Years ) असतो. परंतु, पक्ष हा कायमस्वरूपी ( The Party is Permanent ) असतो. तसेच विधिमंडळ पक्ष ( Legislative Party ) वेगळा आणि मूळ पक्ष संघटना ( Native party organization ) वेगळी हे समजण्यात गफलत करू नये. पक्ष संघटना, विधिमंडळातील पक्ष याबद्दल माहिती दिली.

NCP chief Sharad Pawar
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार
author img

By

Published : Jul 1, 2022, 7:39 AM IST

Updated : Jul 1, 2022, 12:17 PM IST

पुणे : राष्ट्रावदीचे प्रमुख शरद पवार यांनी काल माध्यमांशी संवाद साधून, त्यांना आलेल्या ईडीच्या नोटीसीची माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितले की, अनेक आमदारांची आज ईडीकडून चौकशी सुरू आहे. पण, 5 वर्षांपूर्वी ईडी हे नावदेखील आम्हाला माहिती नव्हते. पण, आता ईडीचे नाव खेड्यापाड्यात ही घेतले जाते. या एजन्सीजचा उपयोग हा सध्या राजकीय उद्देशाने वेगळ्या विचाराचे, विरोधक असलेले जे लोक आहेत त्यांच्यासाठी केला जातो आहे. मलादेखील इन्कम टॅक्सकडून प्रेमपत्र आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मला इन्कम टॅक्सकडून आलेल्या नोटिसा : यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधून, ईडी आणि इन्कट टॅक्सकडून आलेल्या नोटीसीचा उल्लेख करताना, त्यांना मागील 25 ते 30 वर्षांपूर्वीचा लेखाजोखा मागितला असल्याचे ते म्हणालै. 2004 साली मी पार्लमेंटसाठी उभा होतो. त्यामुळे तेव्हाची सर्व डिटेल त्यांनी मागितली आहेत. याच्या चौकशीची नोटीस मला आता आली आहे. परत 2009 साली लोकसभेला जेव्हा मी उभा राहिलो त्याचीही नोटीस मला आली. त्यानंतर 2014 सालची पण मला नोटीस आली आहे. 2020 सालची नोटीसदेखील मला आता आली असल्याची माहिती यावेळी पवार यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणे भाजपच्या वरिष्ठांचा आदेश : शरद पवार यांनी शपथविधी संदर्भातसुद्धा भाष्य केले ते म्हणाले शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरीभाजपकडे तुल्यबळाने आमदार संख्या जास्त असतानाही त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केले. हे वाटते तितके सोपे नाही. कारण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पद भूषवलेली व्यक्ती आहे. त्यांना आता त्यांच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. हे भाजपच्या अतिवरिष्ठ लोकांचा सहभागाशिवाय घडू शकत नाही.

पक्ष हा माझाच राहिला - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( NCP chief Sharad Pawar ) यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. प्रथम त्यांनी बंड आमदारांबद्दल विधान केले, ते म्हणाले की पक्ष संघटना ही वेगळी असते आणि विधिमंडळातील पक्ष हा वेगळा असतो. पक्ष तिकीट देतो तेव्हा उमेदवार लोकांमध्ये जातो आणि मग तो उमेदवार निवडून येतो. मग तो आमदार होतो. आमदारही केवळ पाच वर्षांसाठी असतात. पण पक्ष हा कायमस्वरूपी असतो. असे म्हणत त्यांनी 1980 साली झालेल्या निवडणुकीनंतरचा किस्सादेखील यावेळी सांगितला. त्यावेळी माझ्या पक्षाचे 69 आमदारांपैकी 5 आमदार हे माझ्याबरोबर राहिले बाकी गेले. पण, पक्ष हा माझाच राहिला, असे यावेळी पवार म्हणाले.

शिंदेवर पूर्ण विधिमंडळाची जबाबदारी त्यामुळे त्यांच्यासोबत आमदार : शिंदेंवर शिवसेना प्रमुखांनी विश्वासाने विधिमंडळाची जबाबदारी दिली होती. त्यामुळेच एवढ्या 40 आमदारांना एकत्र करून त्यांची मोट बांधण्यात ते यशस्वी झाले. हे काही एका दिवसात घडलेली प्रक्रिया नाही. मी आता विधिमंडळात सदस्य नाही. त्यामुळे हे प्रकरण कधीपासून चालले होते याची मला माहिती नाही. याचा सुगावा विधिमंडळातील सदस्यांना यायला पाहिजे होता. एवढे सगळे आमदार सुरतवरून गुवाहाटी जाणे. त्यानंतर परत गोव्याला येणे मग मुंबई हा प्रीप्लॅन आहे. हे एक-दोन दिवसात झाले नाही.

वरिष्ठ पदानंतर पुन्हा कनिष्ठ पदावर काम करणे अवघड : एकदा मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर पुन्हा इतर मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे. अर्थात हे एकमेव उदाहरण नाही. शंकराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. त्यानंतर माझ्या मंत्रिमंडळात शंकराव चव्हाण अर्थमंत्री होते. अलीकडच्या काळात शिवाजीराव पाटील निलंगेकर हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. अशोक चव्हाण यांनीही उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले आहे. असे देखील यावेळी पवार म्हणाले.

भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील निर्णयामुळे शिंदे मुख्यमंत्री : भाजपकडे संख्याबळ असतानाही त्यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणे, हा निर्णय वरिष्ठ नेत्यांचा आहे. किंवा हा आदेश नागपूरहून आलेला असणार. त्याशिवाय मुख्यमंत्री पद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद मिळणे हे तसे अवघड आहे. देवेंद्र फडणवीस यांना हे पद स्वीकारणे तसे अवघडच होते हे त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत होते. परंतु, त्यांच्यावरील संघाच्या संस्कारामुळे त्यांनी तो आदेश पाळला असेल, असेही पवार म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी शिवसेना हायजॅक केलीये का? : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हायजॅक केलीय का? अस पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या पक्षातील सहकाऱ्यांचे मत असेल तर माहिती नाही. ते लोकांवर विश्वास टाकतात आणि पूर्ण जबाबदारी देतात हा त्यांचा स्वभाव आहे. उद्धव ठाकरेंनी संघटनेची जबाबदारी आणि विधिमंडळाची संपूर्ण जबाबदारी शिंदेकडे दिली होती. त्याचा हा कदाचित परिणाम आहे की नाही मला माहिती नाही, असेही पवार म्हणाले.

हेही वाचा : Eknath Shinde Maharashtra CM : महाराष्ट्राला मिळाले नवे 'ठाणे'दार; एकनाथ शिंदेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Last Updated : Jul 1, 2022, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.