पुणे: पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पर्वती मतदार संघाच्या Parbati Constituency आमदार माधुरी मिसाळ MLA Madhuri Misal यांच्याकडे जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करून ५ लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात Threats to kill आली आहे.
गुन्हा दाखल याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ (वय ५६, रा. फेअर रोड, गोळीबार मैदान, कॅम्प) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (गु. रजि. नं. १७९ / २२) फिर्याद दिली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी Bibwewadi Police इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडला आहे.
मुलाचे अकाऊंट हॅक याबाबत आमदार माधुरी मिसाळ म्हणाले की माझे दिर दीपक मिसाळ यांना त्यांच्या मोबाईलवर खूप सारे मॅसेजेस म्हणजेच दिवसाला 40 ते 50 मॅसेज धमकीचे येत आहे. पैसे आणून नाही दिलं तर रेपची केस दाखल करू अस मॅसेज पाठवत आहे. आणि दिवसेंदिवस ते रक्कम वाढवत आहे. 2 दिवसाआधी तक्रार देऊन ही काल रात्री 12 वाजेपर्यंत मॅसेज येत होते. आणि शेवटचा मॅसेज असा होता की त्यात पैसे नाही दिले, तर मारून टाकू अशी धमकीच देण्यात आली होती. पोलीस तपास करत आहे. ज्या ज्या मुलांचं यात नाव येत आहे. त्या मुलाचे अकाऊंट हॅक झाले आहेत. जवळजवळ 15 ते 16 नंबरवरून हे मॅसेज येत आहे, अशी माहिती यावेळी आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
जीवे ठार मारण्याची धमकी याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठीचा संपर्क क्रमांक याच्यावर आरोपीने मेसेज केले आहे. त्याने कधी २ लाख, कधी ३ लाख, तर कधी ५ लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले आहे. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर पोलिसांनी भा. द. वि. ३८६ आणि आय टी अॅक्ट कलम ६६ सी नुसार गुन्हा दाखल केला आहे.