बारामती : आईने मोबाईल घेऊन न दिल्यामुळे एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने गळफास घेतल्याची Minor Boy Hanging for mobile धक्कादायक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज येथे घडली Minor Commits Suicide Baramati. गुरुवार 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शुभम मोतीराम धोत्रे वय 14 वर्षे असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. शुभम सोमेश्वर विद्यालय अंजनगाव ता. बारामती येथे इयत्ता नववीमध्ये शिकत होता. याबाबत राजेंद्र अशोक लष्कर वय 27 रा करावागज लष्करवस्ती ता. बारामती यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. Baramati Crime
परिस्थिती हलाखीची, पण मुलाचा मोबाइलसाठी हट्ट - शुभमने आईकडे मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली होती. परंतु, परिस्थिती हलाखीची असल्याने शुभमच्या आईला मोबाईल घेऊन देणे शक्य झाले नाही. म्हणून नैराश्यातून 14 वर्षाच्या शुभमने घराच्या शेजारी असलेल्या पत्राच्या शेडमधील लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.