ETV Bharat / city

Jayant Patil On Nawab Malik Resignation : नवाब मलिकांना राजीनामा देण्याची गरज नाही - जयंत पाटील

अनिल देशमुख यांना अटक होणार याचा अंदाज आल्यामुळे त्यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. पण, केंद्रीय तपाय यंत्रणा तसेच ईडीकडून विविध आरोप देशमुख यांच्यावर होत आहेत. जाणून बुझून आमच्या सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका मंत्र्यांनी राजीनामा दिला तर दुसऱ्यांकडून घेऊ असे होणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील यांनी नवाब मलिक ( Jayant Patil On Nawab Malik Resignation ) यांच्याबाबत दिली.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Mar 1, 2022, 10:08 PM IST

पुणे - अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेणे किंवा त्यांनी राजीनामा देणे हे बंधनकारक नाही, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil On Nawab Malik Resignation ) यांनी दिली. पुण्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

बोलताना जयंत पाटील

शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राजीनामा घेता मग राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून का नाही, असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, अनिल देशमुख यांना अटक होणार याचा अंदाज आल्यामुळे त्यांच्याकडून मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. पण, केंद्रीय तपाय यंत्रणा तसेच ईडीकडून विविध आरोप देशमुख यांच्यावर होत आहेत. जाणून बुझून आमच्या सरकारमधील मंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका मंत्र्यांनी राजीनामा दिला तर दुसऱ्यांकडून घेऊ असे होणार नाही, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.

राज्यपालांचे विधान योग्य नाही - दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबात केलेल्या व्यवक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना माहित आहे. मात्र, राज्यपालांचे विधान योग्य नाही. याबाबत औरंगाबाद न्यायालयाने निर्णय घेतला आहे. राज्यपाल हे राज्याचे मुख्य असल्याने आम्ही आमच्या मर्यादा ओळखून याबाबत जास्त बोलणार नाही, असा टोलाही मंत्री जयंत पाटील लगावला.

हेही वाचा - Bacchu Kadu slammed MH governor : राज्यपालांनी मूर्खपणा केला- बच्चू कडू संतापले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.