पुणे - उद्धव ठाकरे यांची शिवसेना सैनिक नसलेली सेना आहे. त्यामुळे त्या सेनेला काही अर्थ नाही. आम्हीच खरी शिवसेना आहोत. आम्ही दादरमध्ये नवीन सेना भवन उभाणार आहोत, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकरांनी Shinde group spokesperson and minister Deepak Kesarkar दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यांनी आज उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती या दोघांची भेट घेतली. या दोघांचे आशीर्वाद आणि ही मंडळी आपले श्रद्धास्थान आहे. त्यामुळे आपण त्यांची भेट घेऊन कामाला सुरुवात केल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
काही लोक राज्यभर फिरत आहे. परंतु वारसा रक्ताचा नसतो तर तो विचाराचा आणि आपल्या श्रद्धास्थानाचा असतो. असे म्हणत त्यांनी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष आहेत. त्या संदर्भात मोठी चर्चा झाली तसेच आपली गड किल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या वारसा जगाला पुढे नेण्यासाठी महत्त्वाचा असल्याने त्यांच्या विकासासाठी जे जे काही आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टीसाठी चर्चा झाली असल्याचे दीपक केसरकरांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Shinde Group ठाकरेंना आणखी एक धक्का शिंदे गट दादरमध्ये उभारणार प्रतिशिवसेना भवन