पुणे - एकीकडे महागाईचे चटके सहन करणाऱ्या सर्वसामान्यांना आता दूध आणखी महाग मिळणार आहे. राज्यातील सर्व सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूधाच्या विक्री किंमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (The Price of Milk Expensive Two Rupees) दरम्यान, दूध उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार असून खरेदीदरातही प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
सहकारी व खासगी दूध व्यवसायिक उपस्थित होते
ही सभा पुणे येथे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेस महानंद, चितळे, गोवर्धन, गोविंद, ऊर्जा, शिवामृत, कात्रज, राजहंस, स्फूर्ती, सोनाई, शिवप्रसाद नेचर डिलाइट, रिअल डेअरी, एस. आर. थोरात, अनंत, संतकृपा, सुयोग इत्यादी सहकारी व खासगी दूध व्यवसायिक उपस्थित होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे.
विक्रीच्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली
दूध पावडर व बटर, दह्याचे वाढलेले दर, त्यामुळे दूधाची वाढती मागणी आणि तुलनेने कमी उत्पादन यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. भरीस भर म्हणून पशुखाद्य, इंधन दरात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील दुग्ध व्यवसाय अडचणीचा झाला आहे. या पार्श्वभूमीवर दूध खरेदी विक्रीच्या दराबाबत निर्णय घेण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती त्यात तस निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - दिशा सालियानच्या प्रियकराची न्यायाधीशांसमोर चौकशी, राणे पिता पुत्र जामीन अर्जावर आज निकाल