ETV Bharat / city

मराठी राजभाषा गौरव दिन विशेष : 'धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी'..अभिजात दर्जा मिळण्याचे काय आहेत निकष?

आपण अनेकदा आपल्या या माय मराठीचा गाजावाजा करतो. आपली मराठी भाषा ही साता समुद्रापार जगातल्या कानाकोपऱ्यात ( Marathi language in world ) पोहोचली आहे. मात्र, आजही आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा ( Classical status for language ) मिळू शकला नाही हे आपल दुर्दैवच आहे. त्यासाठी प्रत्येक मराठी माणूस यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतो.

मराठी राजभाषा गौरव दिन विशेष
मराठी राजभाषा गौरव दिन विशेष मराठी राजभाषा गौरव दिन विशेष
author img

By

Published : Feb 27, 2022, 6:14 AM IST

पुणे - आज मराठी राजभाषा गौरव दिन ( Marathi Rajbhasha Gaurav Din ) आहे. आपल्या भाषेचा अभिमान बाळगत तिचा जागर करण्याचा दिवस आहे. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, असे म्हणत प्रत्येक वर्षी २७ फेब्रुवारीला ( Maratha Rajbhasha Gaurav Din celebration ) आपण मराठी दिवस मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करतो. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

आपण अनेकदा आपल्या या माय मराठीचा गाजावाजा करतो. आपली मराठी भाषा ही साता समुद्रापार जगातल्या कानाकोपऱ्यात ( Marathi language in world ) पोहोचली आहे. मात्र, आजही आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा ( Classical status for language ) मिळू शकला नाही हे आपल दुर्दैवच आहे. त्यासाठी प्रत्येक मराठी माणूस यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतो. मात्र, आपल्या मराठीला गेल्या अनेक वर्षांपासून अभिजात दर्जा प्राप्त होण्यासाठी विलंब होत आहे.

मराठी राजभाषा गौरव दिन विशेष

हेही वाचा-मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन

अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याची मागणी-
काही दिवसांपूर्वीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी चार हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींना पाठवण्यात आली आहे. सुमारे १० वर्षांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. पण अभिजात म्हणजे काय आणि तो भाषेला दर्जा कसा मिळतो? त्याचे निकष काय आहेत? हे जाणून घेणेदेखील तितकच महत्त्वाचे आहे. भाषा अभ्यासक प्रा. श्रीकांत बहुलकर आणि डॉ. मैत्रैयी देशपांडे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला आहे.

हेही वाचा-मराठी राजभाषा दिन..! तरुणीने तयार केल्या 'अक्षरांच्या चकल्या'

आतापर्यंत या भाषांना मिळालाय अभिजात दर्जा
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी संशोधन करून त्याचा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी 2012 मध्ये प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली गेली. एका वर्षात या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला. २००४ मध्ये भारतात तामिळ या भाषेला अभिजात दर्जेचा मान मिळाला. २००५ साली संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलुगू, तर २०१३ मध्ये मल्याळम आणि २०१४ मध्ये ओडिया भाषांना हा दर्जा मिळाला आहे. मात्र मोदी सरकारमध्ये अद्याप आपल्या भाषेला हा दर्जा मिळाला नाही.

हेही वाचा-मराठी भाषा गौरव दिन : राज्यातील विविध बोलीभाषांमध्ये सरकारच्या '100 दिवसांवर 100 शब्द'

काय आहेत अभिजात दर्जा मिळण्याचे भाषेचे फायदे
अभिजात भाषेचे फायदे असे की या भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलंन्स फॉर स्टडिज स्थापन करण्यात येते. प्रत्येक विद्यापीठात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र उभारण्यात येते. तसेच स्कॉलर्ससाठी दरवर्षी दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कारदेखील राखीव असतात. यंदा मराठीला हा दर्जा मिळेल का? असे प्रश्न दिल्लीत महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी विचारले. यावर हा प्रस्ताव केंद्र सरकारमध्ये विचाराधीन आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल, असे मंत्र्यांनी सांगितले आहे.

मायमराठीत सर्वात जास्त साहित्य प्रकार
‘माझा मराठीचि बोलु कवीतके, अमृतातेही पैजेसी जिंके’ असा अभिमान निर्माण करून संत ज्ञानेश्वरांनी गीतेतील तत्त्वज्ञान मराठीतून सांगितले. या मराठीनगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. देशात अनेक भाषा बोलल्या जातात. मात्र, आपल्या माय मराठी भाषेत सर्वात जास्त साहित्य प्रकार आणि कलाप्रकार आहेत. ज्या भाषेला सर्वात जुना इतिहास आहे, ज्या भाषेला संतांचे बोल आहेत, अशा भाषेला नक्कीच अभिजात दर्जा मिळावा हीच इच्छा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.