ETV Bharat / city

Pune Corporators : आमदारांपाठोपाठ नगरसेवकांनी कोरोना काळात घेतले खासगी रुग्णालयात उपचार; केले कोट्यावधी खर्च - दाेन वर्षात साडे पाच काेटीहून अधिक खर्च नगरसेवक

नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आराेग्यावर गेल्या दाेन वर्षात साडे पाच काेटीहून ( Pune corporators Five crores spent Medical treatment ) अधिक रुपये खर्ची पडले आहे. विशेष म्हणजे काेराेना कालावधीत ( Corona ) हा खर्च वाढला आहे. यामध्ये आमदार पदावर असलेल्या नगरसेवकांकडून माेठ्या प्रमाणावर वैद्यकीय कारणासाठी पैसे खर्च करण्यात आले आहे.

पुणे महापालिका
पुणे महापालिका
author img

By

Published : Apr 27, 2022, 4:23 PM IST

Updated : Apr 28, 2022, 6:27 PM IST

पुणे - राज्यातील आमदार आणि मंत्रिमंडळातील नेते मंडळी यांनी कोरोना काळात खासगी रुगणलायत स्वतःवर उपचार केले असल्याचे उघड झाल्यानंतर पुण्यातील नगरसेवकांचा ( Corporators spend lakhs of rupees on Medical treatment ) असाच प्रकार माहिती अधिकारातून उघड झाले आहे. नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आराेग्यावर गेल्या दाेन वर्षात साडे पाच काेटीहून ( Pune corporators Five crores spent Medical treatment ) अधिक रुपये खर्ची पडले आहे. विशेष म्हणजे काेराेना कालावधीत ( Corona ) हा खर्च वाढला आहे. यामध्ये आमदार पदावर असलेल्या नगरसेवकांकडून माेठ्या प्रमाणावर वैद्यकीय कारणासाठी पैसे खर्च करण्यात आले आहे.

आढावा घेताना प्रतिनिधी

नगरसेवकांनी महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य याेजनेचा घेतला लाभ : हडपसर येथील गाेंधळेनगर येथील नागरिक तानाजी घाेलप यांनी माहिती अधिकारात २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षात महापािलकेने नगरसेवक आणि माजी नगरसेवकांकरीता राबविण्यात येणाऱ्या वैद्यकीय सहाय्य याेजनेतील खर्चाची माहिती मिळविली आहे. या माहितीनुसार नगरसेवकांच्या आराेग्यावर लाखाे रुपये खर्ची पडल्याचे स्पष्ट हाेत आहे. विशेष म्हणजे आमदार म्हणून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून मिळणाऱ्या सवलतीप्रमाणेच 140 हुन अधिक नगरसेवकांनी महापालिकेच्या वैद्यकीय सहाय्य याेजनेचा लाभ घेतला आहे. तसेच काही नगरसेवकांनी सलग दाेन्ही वर्षांत याेजनेचा लाभ घेण्यात कमतरता दाखविली नाही. विशेष म्हणजे महापालिकेच्या विविध समितीचे पदाधिकारी आणि स्थायी समितीसारख्या समितीत सदस्य म्हणून काम करणाऱ्यांचा यात समावेश आहे. तर अनेक नगरसेवकांचा वैद्यकीय खर्च हा काही हजारातच झालेला आकडेवारीतून दिसत आहे.

सर्वच पक्षीय नगरसेवकांनी उचलला लाभ : पुण्यातल्या जनतेने टॅक्स रुपी भरलेल्या पैशांतून नगरसेवकांनी ही बिले घेतली आहेत. पुण्यातील जवळपास 140 नगरसेवकांचा यात समावेश आहे. 10 ते 12 लाखांची बिले घेतलेले 12 नगरसेवक असल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या काळात नगरसेवकांनी बिले घ्यायला नको होती. आमच्यासाठी सरकारी हॉस्पिटल आणि नगरसेवकांसाठी खासगी हॉस्पिटल, पैसे कुणाचे तर जनतेनेच. महानगरपालिकेत कर रुपी पैसे साडेतीन ते चार हजार कोटी रुपये जमा होतात. मात्र त्याचा उपयोग सामान्यांच्या मूलभूत सुविधांसाठी करणे आवश्यक असतांना त्यातील पैसे नगरसेवकांनी स्वतःची बिले काढली असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्व पक्षांचे नगरसेवक असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते तानाजी घोलप यांनी दिली आहे.

'खासगी रुग्णालयात उपचार का घेतला' : नगरसेवकांनी कोरोना काळात जर सर्व सामान्य नागरिकांना चांगली सेवा दिली तर तुम्ही स्वतः त्या सेवेचा लाभ का नाही घेतला? तुम्ही खासगी रुग्णालयात उपचार का घेतले? असा सवाल घोलप यांनी उपस्थित केला आहे. नगरसेवकांनी घेतलेली बिले ही सर्व सामान्य नागरिकांच्या खिशातून घेतलेली आहेत. महानगरपालिकेच्या असलेल्या योजनांचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना किंचित मिळतो. मात्र नगरसेवकांना ताबडतोब आठ कोटी रुपये खर्च केले जातात. हे असे का सर्व समान न्याय मिळायला हवा, सर्वांना समान आरोग्य सुविधा मिळायला हव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते खिसाल जाफरी यांनी केली आहे.

दाेन नगरसेवकांच्या उपचाराकरीताही महापािलकेने खर्च केला : वैद्यकीय सहाय्य याेजनेसाठी २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरीता २ काेटी ७० लाख रुपयांची तरतुद केली गेली हाेती. ही तरतुद खर्ची पडल्यानंतर १ काेटी ६७ लाख रुपये वर्गीकरणातून उपलब्ध करून दिले गेले. महापािलकेच्या आराेग्य विभागाकडे जमा झालेल्या ४१९ बिलांपाेटी ४ काेटी ३६ लाख ८४ हजार रुपये खर्ची पडले. यावर्षी सुमारे ३५ बिलांची रक्कम एक लाख रुपयाहून अधिक आहे. आजारपणामुळे मरण पावलेल्या दाेन नगरसेवकांच्या उपचाराकरीताही महापालिकेने खर्च केल्याचे समोर आले आहे.

माजी नगरसेवकांसाठी सुमारे १ काेटी २१ लाख रुपये खर्च : २०२१ -२०२२ या आर्थिक वर्षाकरीता वैद्यकीय सहाय्य याेजनेसाठी सुमारे ४ काेटी २० लाख रुपयांची तरतुद केली गेली हाेती. यापैकी सुमारे १ काेटी १८ लाख रुपये १४९ बिलांपाेटी खर्च झाले आहे. याचवर्षी माजी नगरसेवकांसाठी सुमारे १ काेटी २१ लाख रुपये खर्च झाले आहेत. तर या आर्थिक वर्षात एक लाखाहून अधिक रक्कम असलेली सुमारे ५७ बिले आहेत.

...म्हणून वापरली : आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले की, एमर्जन्सी म्हणून पालिकेच्या सुविधा वापर नगरसेवकांकडून केला जातो. कारण तशी सुविधा नगरसेवकांसाठी उपलब्ध आहे. मात्र त्याची चांगली पॉलिसी करून सुद्धा ती चांगली अमलात आणली जाऊ शकते. या पॉलिसीसाठी सविस्तर चर्चा करून यात आणखी काय करता येईल यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे. सुविधा असताना ती घेणे आणि नसतानाही ती घेणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे शिरोळे म्हणाले आहेत. माहिती अधिकाराच्या माहितीतून नागरसेवकांनीच जनतेच्या पैशांची लूट केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. तर याबाबत महापालिकेतील आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क देखील होऊ शकला नाही.

हेही वाचा - Hawala racket Aurangabad : औरंगाबादमध्ये तांदूळ व्यापाऱ्याच्या दुकानात हवाला रॅकेट, 1 कोटी रुपये जप्त

Last Updated : Apr 28, 2022, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.