पुणे - महाराष्ट्र दिनाच्या ( Maharashtra Day ) पूर्वसंध्येला पुण्यात महाविकास आघाडीतर्फे केंद्र सरकारच्या विरोधात सद्भावना निर्धार सभेच आयोजन ( Mahavikas Aghadi Rally In Pune ) करण्यात आले आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात 30 एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे. या सभेत केंद्र सरकारच्या विरोधात काही ठराव मांडणार येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ( Mahavikas Aghadi Rally Against Central Government ) आज ( 28 एप्रिल ) पत्रकार परिषद घेत जाहीर केले आहे.
या सभेला महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षासह डाव्या व पुरोगामी पक्ष संघटना देखील उपस्थित राहणार आहेत. देशांमध्ये राज्यांची आर्थिक आणि राजकीय कोंडी करणारे निर्णय केंद्रामधील मोदी सरकार घेत आहे. त्यामुळे आपल्या राज्य घटनेलाच सुरुंग लागत असल्याचा आरोप यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
धर्मांध सत्तेच्या विरोधात सभा - केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या महागाई विरोधात काम करण्याचे सोडून यावरून जनतेच लक्ष वळवण्यासाठी धर्माचा वापर करत लोकांचे लक्ष वळवले जात आहे. केंद्र सरकारच्या याच धोरणांच्या विरोधात महाविकास आघाडीने या सभेचे आयोजन केले आहे. इंधन दर, महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा होणार असल्याची माहिती देखील नेत्यांकडून देण्यात आली आहे. राज्यातले आणि देशातले अनेक पक्षाचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.