पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांपासून ऑनलाईन शाळा सुरू होत्या. कोरोनामुळे 2 वर्षे दहावी, बारावीच्या परीक्षा या घेण्यात आल्या नव्हत्या. पण, यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. आजपासून राज्यात इयत्ता 10 वीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. 2 वर्षांनंतर ऑफलाईन पद्धतीने ( Maharashtra ssc exam 2022 ) परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. पुण्यातील पेरुगेट भावे हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे.
हेही वाचा - Sunflower Oil Rate Hike : युक्रेन आणि रशियावरून सुर्यफुल तेलाची होणारी निर्यात थांबली- पुना मर्चंट
दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तब्बल 21 हजार 384 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ज्या शाळेत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे त्याच शाळेत विद्यार्थी हे परीक्षा देणार असल्याने आणि तब्बल दोन वर्षांनंतर परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोठ्या प्रमाणात आनंद होत आहे की, परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होत आहेत. परीक्षेसाठी वेळ मिळाल्याने अभ्यास देखील पूर्ण झाला असल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
परीक्षेसाठी केलेल्या उपाययोजना
- नेहमीपेक्षा १५ दिवस उशिराने परीक्षेचे आयोजन.
- ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित लेखी परीक्षा.
- नियोजित वेळेपूर्वी १० मिनिटे अगोदर मिळणार प्रश्नपत्रिका.
- ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ.
- ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे अधिक वेळ.
- एका वर्गासाठी २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र सिलबंद पाकिट असेल.
हेही वाचा - शिवसंग्रामच्या वतीने मागासवर्गीय आयोगाला पत्र, मराठा सामाजाचा मागासलेपणा सिद्ध करण्याची मागणी