ETV Bharat / city

Maharashtra Monsoon Update : राज्यभरात पावसाचा जोर कमी, विदर्भात पूर ओसरण्यासही सुरुवात - ढगाळ वातावरण

Maharashtra monsoon Updates : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळाल्यावर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे.

Maharashtra Monsoon Update
Maharashtra Monsoon Update
author img

By

Published : Jul 20, 2022, 12:07 PM IST

पुणे - महाराष्ट्रात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळाल्यावर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. गेल्या 2 दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली. राज्यात काही भागात तुरळक पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी पुराचे साचलेले पाणी ओसरू लागले आहे. ( Maharashtra Monsoon Rain Update ) मुंबई आणि नवी मुंबईत पावसाची रिपरिप सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे अधून- मधून पावसाची रिपरिप सुरू आहे. धुळे, हिंगोली जिल्ह्यात मंगळवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. भंडारा आणि गोंदियामध्येही मंगळवारपासून पाऊसाने दडी मारली आहे.

विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पाऊस - गेल्या 2 दिवसांपासून विदर्भात सुरू असलेलं पावसाचं थैमान आजही कायम आहे. विदर्भातल्या आठ जिल्ह्यांना महापुराचा तडाखा बसलाय. विदर्भात सरासरीपेक्षा 180 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. वर्धा, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती कायम आहे. ( Maharashtra Monsoon Rain Update ) आज अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे तर इतर जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे अमरावतीच्या 30 तर तर वर्ध्याच्या 42 गावांचा संपर्क तुटला. मदत आणि बचावकार्यासाठी वर्ध्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या दाखल झाल्यात.

चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा वेढा - जिल्ह्यातील नद्या संततधार पावसाने फुगल्या असून जिल्ह्यात पुराचा फटका बसला आहे. चिमूर पाठोपाठ भद्रावती, वरोरा आणि मूल तालुक्यातील अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत. शेकडो घरे पाण्याखाली गेली आहेत. माजरी या गावाला पुराने वेढले आहे. ( Flood Situation in Chandrapur ) तर बेलसनी हे गाव पुर्णतः पाण्याखाली गेले आहे. ( Heavy Rains Chandrapur ) या सर्व ठिकाणी बचावकार्य सुरू असून शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पावसामुळे नदी- नाले दुथडी भरले - संततधार पावसामुळे आधीच नदी- नाले दुथडी भरून वाहत असताना निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने शिराना, कोराडी आणि वर्धा नदीला पुर आला आहे. ( Heavy Rains Chandrapur ) त्यामुळे माजरीसह परिसरातील अनेक गावांना पुराचा विळखा बसला आहे. आतापर्यंत पुरात अडकलेल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ( Flood Situation in Chandrapur ) प्रशासनाचे मदत कार्य सुरु आहे. चंद्रपूर- वणी मार्ग बंद झाला आहे. तसेच बामणी येथील वर्धा नदी पुलावर पुराचे पाणी वाढल्याने बल्लारपूर राजूरा हैदराबाद मार्ग बंद करण्यात आले आहे.

11 गावांना पुराने वेढा दिला - सोमवारी मध्यरात्री माजरीच्या तेलुगु दफाई, आंबेडकर वार्ड, शांती कॉलोनी, चैतन्य कॉलोनी, दफाई क्रमांक- 1, एकता नगर या भागात पाणी घुसायला सुरूवात झाली. त्यामुळे रात्रीच लोक घरातील सामान आवरुन बाहेर पडले. त्यांनी सुरक्षित स्थळी जाऊन आश्रय घेतला. जे पुरात अडकले, त्यांना आज सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. वेकोलि वसाहतीमधील खाली सदनिका आणि महावीर शाळेत त्यांना ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने त्यांच्या भोजनाची व्यवस्था केले आहे. माजरी लगतच्या पूरामुळे पळसगाव, पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराणा, कुचना, नागलोन, विसलोन, चालबर्डी, कोंढा, देऊरवाडा या 11 गावांना सुद्धा पुराने वेढा दिला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पहिल्यांदाच माजरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि पोलीस ठाण्यापर्यंत पुराचे पाणी पोहचले. पुरामुळे अनेक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पर्यायी रस्ता नसल्याने वेकोलिचे कामगार सुद्धा कामावर पोहोचले नाही. परिणामी वेकोलितील उत्खनन बंद होते. माजरी परिसरात 1994 च्या पुराची पुनरावृत्ती झाली आहे. नागरिक सध्या भयभीत झाले आहे. कोराडी नाल्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पळसगावत पाणी शिरले. काही नागरिक पुरात अडकले होते. परंतू चंद्रपूर येथून बचाव पथक दाखल झाले आणि या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील चारवट- हडस्ती मार्गावर ईरई नदीचे 4 फुट पाणी आहे. त्यामुळे हा मार्ग बंद आहे. या तालुक्यातील अनेक गावात अद्याप पुरसदृश्य परिस्थिती आहे.

हेही वाचा - Flood Situation in Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती तालुक्याला पुराचा वेढा, घरांची पडझड, जनजीवन विस्कळीत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.