ETV Bharat / city

Duplicate CM : मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारा माणूस; डूप्लिकेट सीएम विजय माने यांचे स्पष्टीकरण - सीएम विजय माने यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो व्हायरल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखे दिसणारे डूप्लिकेट सीएम नावाने प्रसिद्ध झालेले विजय माने (Maharashtra Duplicate CM Vijay Mane) हे आता अडचणीत सापडले आहेत. सराईत गुन्हेगार मोहोळ यांच्यासोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (CM Vijay Mane photo viral with criminal) झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल (case filed against duplicate CM Vijay Mane) करण्यात आला आहे.

डुप्लिकेट मुख्यमंत्री विजय माने यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो व्हायरल

author img

By

Published : Sep 20, 2022, 2:00 PM IST

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखे दिसणारे डूप्लिकेट सीएम नावाने प्रसिद्ध झालेले विजय माने (Maharashtra Duplicate CM Vijay Mane) हे आता अडचणीत सापडले आहेत. सराईत गुन्हेगार मोहोळ यांच्यासोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (CM Vijay Mane photo viral with criminal) झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल (case filed against duplicate CM Vijay Mane) करण्यात आला आहे.

डुप्लिकेट मुख्यमंत्री विजय माने त्यांचा गुन्हेगारासोबतचा फोटो व्हायरल झालेल्या फोटोबाबत स्पष्टीकरण देताना

शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल - या घटनेनंतर डूप्लिकेट सीएम विजय माने यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. विजय माने म्हणाले की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा माणूस आहे. सर्व सामान्यांच्या सेवेकरिता हे मी सर्व करत होतो. परंतु, ज्याने कुणी हे फोटो काढले आहे. मला माहिती नसताना न कळत काढलेले आहेत. फोटो व्हायरल करणारा व्यक्ती दुसरा कुणी तरी असून शहानिशा न करता माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री माझ्यासाठी देव - मी पोलिसांना सहकार्य केलेले आहे. मी वेळोवेळी सांगितले आहे की, मुख्यमंत्री माझ्यासाठी देव आहेत. त्यांची प्रतिमा कधी मलिन होईल असे कार्य मी कधी केले नाही आणि करणारही नाही; कारण माझ्या गुरुप्रमाणे ते आहेत. तरी काही लोकांनी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी मुख्यमंत्र्यांची कधी बदनामी केलेली नाही, समाजसेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अस यावेळी माने यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.