ETV Bharat / city

सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील - उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड येथील 4 हजार 888 घरांसाठीची ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची माहिती पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : May 21, 2021, 12:30 PM IST

पुणे - राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्कांची घरे मिळवून देण्याचे काम सुरू आहे. 2022 पर्यंत सर्वांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सांगून नागरिकांनी या प्रकियेमध्ये सहभागी होऊन योग्य त्या सूचना कराव्यात. या सूचना लक्षात घेऊन तशा सुधारणा करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

पुण्यातील अल्पबचत सभागृहात पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामार्फत आयोजित कार्याक्रमात बोलत होते. आकुर्डी येथील पेठ क्रमांक 12, येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत विकसित करण्यात आलेल्या एकूण 4 हजार 883 सदनिकांसाठीची ऑनलाईन सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आली. या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न घटकांसाठी 3 हजार 117 व अल्प उत्पन्न घटकांसाठी 1 हजार 566 सदनिकांचा समावेश आहे.

निराश होऊ नका, तुम्हालाही घरे मिळतील-

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकांचे स्वप्न असते. या सोडतीमध्ये ज्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले नाही, त्यांनी निराश होऊ नये, पुढच्या लॉटरी प्रक्रियेमध्ये परत अर्ज करावेत, आपलेही घराचे स्वप्न पुर्ण होईल. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरे मिळवून देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काम सुरू आहे. घरे उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया संगणकीय असून अत्यंत पारदर्शक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वशिलेबाजीला थारा नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.