ETV Bharat / city

भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुंचे निर्जंतुकीकरण शक्य, पुण्यात तयार करण्यात आलंय 'हे' यंत्र

पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या आनंद मेश्राम यांनी भाजीपाला आणि जिवनावश्यक वस्तुंच्या निर्जुंतुकीकरणासाठी मेक इन इंडियाच्या धर्तीवर 'गो कोरोना कॅबिनेट' हे यंत्र तयार केले आहे.

author img

By

Published : Jul 12, 2020, 7:01 PM IST

गो कोरोना कॅबिनेट
गो कोरोना कॅबिनेट

पुणे - कोरोनाच्या काळात प्रत्येक जण कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेत आहे. बाजारातील भाजीपाल्यापासून ते विविध जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करताना योग्य त्या घबरदाऱ्या घेण्याचा प्रयत्न करतो आहे. मात्र, या वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासंदर्भात अनेकांच्या मनात साशंकता असते. ही शंका दूर करण्यासाठी 'गो कोरोना कॅबिनेट' यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे.

गो कोरोना कॅबिनेट यंत्र

पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या आनंद मेश्राम यांनी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी मेक इन इंडियाच्या धर्तीवर 'गो कोरोना कॅबिनेट' हे यंत्र तयार केले आहे. मेश्राम यांनी अतिनील किरणांवर विकसित केलेले 'गो कोरोना' आणि 'गो कोरोना कॅबिनेट' या यंत्राच्या माध्यमातून भाजीपाला तसेच बाजारातील इतर वस्तुंचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे.

अतिनील किरणे सूक्ष्मजीवांच्या 'डीएनए'मध्ये बिघाड करतात. गेले अनेक वर्ष ऑपरेशन थेटर सोबतच अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी या किरणांचा वापर केला जातो. याचाच आधार घेत मेश्राम यांनी निर्जंतुकीकरण यंत्र विकसित केल आहे. हे यंत्र पूर्णत: मेक इन इंडियाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. तसेच अतिनिल किरणांचा मारा प्रमाणित करण्यासाठी, हे यंत्र केंद्र सरकारच्या मंजुरी करता पाठवण्यात आले आहे.

हेही वाचा - पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाडांची तडकाफडकी बदली; विक्रम कुमार नवे आयुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.