ETV Bharat / city

लोणावळ्यात पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढताना पोलिसांची कसरत; पोलीस मित्राचा थोडक्यात वाचला जीव - धबधबा

काही दिवसांपूर्वीच भुशी धरणावर पर्यटकांना वाचवण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांना आपला जीव धोक्यात घालावा लागला होता. यानंतर धबधब्या खालील भोवऱ्यात पडलेला मृतदेह बाहेर काढताना पोलीस मित्राला आपला जीव धोक्यात घालावाल लागला. यामुळे पर्यटकांचा जीव असो की मृतदेह दोन्हीना बाहेर काढण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागत आहे.

लोणावळ्यात पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढताना पोलिस मित्राचा थोडक्यात वाचला जीव
author img

By

Published : Jul 31, 2019, 11:57 AM IST

पुणे - पर्यटकाचा धबधब्या खाली अडकलेला मृतदेह भोवऱ्यातून बाहेर काढताना लोणावळा पोलिसांना आपला जीव धोक्यात घालवा लागत असल्याचे समोर आले आहे. लोणावळ्यात श्रीराम साहू नावाच्या पर्यटकांचा मद्यधुंद अवस्थेत धबधब्या खालील भोवऱ्यात बुडून मंगळवारी दुपारी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह काढण्यासाठी जीवघेणी कसरत पोलिसांना करावी लागली. यावेळी एका पोलीस मित्राचा जीव थोडक्यात बचावल्याचे समोर आले आहे.

लोणावळ्यात पर्यटकाचा मृतदेह बाहेर काढताना पोलिस मित्राचा थोडक्यात वाचला जीव

काही दिवसांपूर्वीच भुशी धरणावर पर्यटकांना वाचवण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांना आपला जीव धोक्यात घालावा लागला होता. यानंतर पर्यटकांना वाचवण्यात पोलिसांना यश आले होते. श्रीराम साहू हा पर्यटक मंगळवारी मित्रांसह लोणावळ्यात फिरण्यासाठी आला होता. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत घुबड तलावाच्या शेजारी असलेल्या धबधब्याखाली जाऊन उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होता. मात्र, पाण्याचा वेग आणि प्रवाह जास्त असल्याने खाली भोवरा तयार झाला होता. या भवऱ्यात बुडून साहूचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती लोणावळा पोलिसांना देण्यात आली, पोलीस कर्मचारी आणि पोलीस मित्र घेऊन घटनास्थळी पोहोचले. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मानवी साखळी करून मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, एकाचा पाय घसरून तो खाली वाहत गेला. तेव्हा उपस्थित नागरिकांनी त्याला वाचावले. मात्र, पर्यटकांचा जीव वाचवायचे असो की मृतदेह बाहेर काढायचा असो यासाठी लोणावळा शहर पोलिसांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागत आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. भुशी धरणावर ही अश्याच प्रकारे आपला जीव धोक्यात घालून काही पर्यटकांना पोलिसांनी वाचवले होते.

Intro:mh_pun_02_tourist_dead_body_10002Body:mh_pun_02_tourist_dead_body_10002

Anchor:- पर्यटकाचा धबधब्या खाली असलेला मृतदेह भोवऱ्यातून बाहेर काढताना लोणावळा पोलिसांना आपला जीव धोक्यात घालवा लागत असल्याचे समोर आले आहे. लोणावळ्यात श्रीराम साहू नावाच्या पर्यटकांचा मद्यधुंद अवस्थेत धबधब्या खालील भोवऱ्यात बुडून मंगळवारी दुपारी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेह काढण्यासाठी जीवघेणी कसरत पोलिसांना करावी लागली यात पोलीस मित्राचा जीव थोडक्यात बचावला आहे. काही दिवसांपूर्वीच भुशी धरणावर पर्यटकांना वाचवण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांना आपल्या जीव धोक्यात घालत पर्यटकांना वाचवण्यात यश आले होते. श्रीराम साहू हा पर्यटक मंगळवारी मित्रांसह लोणावळ्यात फिरण्यासाठी आला होता. तेव्हा मद्यधुंद अवस्थेत तो घुबड तलावाच्या शेजारी असलेल्या धबधब्याखाली जाऊन उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आनंद घेत होता. परंतु पाण्याचा वेग आणि प्रवाह जास्त असल्याने खाली भोवरा तयार झाला होता. त्यात बुडून साहूचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती लोणावळा पोलिसांना देण्यात आली, ते पोलीस कर्मचारी आणि पोलीस मित्र घेऊन घटनास्थळी पोहचले. धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मानवी साखळी करून मृतदेह बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र एकाचा पाय घसरून तो खाली वाहत गेला. तेव्हा उपस्थित नागरिकांनी त्याला बचावले. परंतु, पर्यटकांचा जीव असो की मृतदेह दोन्हीना बाहेर काढण्यासाठी लोणावळा शहर पोलिसांना आपल्या जीवाची बाजी लावावी लागत आहे हे मात्र तितकेच खरे आहे. भुशी धरणावर ही अश्याच प्रकारे आपला जीव धोक्यात घालून काही पर्यटकांना पोलिसांनी वाचवले होते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.