पुणे - सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड या पुण्यातील बापलेकाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता त्यांच्याकडील अलिशान गाड्या जप्त केल्या आहेत. त्यानंतर त्यांनी वेगवगळ्या गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या मोटारकार पोलिसांनी जप्त करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत जप्त केलेल्या आलिशान गाड्यांमध्ये रोल्स रॉयल, मर्सडिझ, रेंज रोवर, पजेरो अशा कोट्यवधी किंमतीच्या गाड्यांचा समावेश आहे.
लोकांना लुबडले
पोलिसांनी कारवाईचा फास आवळताच गायकवाडने लोकांकडून लुबडलेल्या खजिन्याबाबत माहिती दिली आहे. लोकांच्या जमिनी ताब्यात घेऊन बळजबरीने स्वत:च्या व कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने करून घेणे हा गायकवाडचा मुख्य व्यवसाय असल्याचे आता पुढे आले आहे. नानासाहेब शंकरराव गायकवाड ऊर्फ 'औंधचा भाऊ' याच्यासह त्याचा मुलगा गणेश नानासाहेब गायकवड आणि साथीदारांविरोधात मागील काही वर्षाच्या कालावधीमध्ये खुनाचा प्रयत्न, खंडणीसाठी व जबर दुखापतीसाठी पळवुन नेणे, दुखापत करणे, बेकादेशीर जमाव जमविणे, कट रचून बनावटीकरण करून फसवणूक करणे, डांबून ठेवणे, जिवे मारण्याची धमकी देणे, घातक अग्नीशस्त्र बाळगणे, अवैधरीत्या पठाणी पद्धतीने सावकारी करणे वगैरे गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. गायकवाड याच्यावर मोकाची कारवाई झाल्यानंतर त्यांच्या अनेक कहाण्या समोर येऊ लागल्या आहेत.
आत्ता पर्यंत 5 कोटी 48 लाख 70 हजार रुपयांचं ऐवज जप्त
नाना गायकवाड याच्या विरोधात येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलीस तपासात त्याचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. आत्तापर्यंत 5 कोटी 48 लाख 70 हजार रुपयांचे ऐवज जप्त करण्यात आहेत. यामध्ये सोने-चांदीचे दागिने, विविध प्रकारचे आलिशान वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच, अजूनही तपास सुरू आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी दिली आहे.
अनेक दृष्कृत्ये तसेच क्रुरकहाण्या जगासमोर येऊ लागल्या
नानासाहेब गायकवाड हे चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. दरम्यान, गणेश गायकवाड हा कॉंग्रेसचा पदाधिकारी होता. त्यास पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. पैसा व इस्टेट कमावून देखील मुलाला आमदार व मंत्री करण्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचे अनेक असे कृत्य समोर येत आहेत.