ETV Bharat / city

'देशमुख राज्याचे गृहमंत्री आहेत, की एका पक्षाचे नेते म्हणून अशी वक्तव्ये करतात' - प्रवीण दरेकरांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंह प्रकरणी भाजपवर टीका केल्यानंतर आता भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर पलटवार केला जात आहे. अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री म्हणून की एका पक्षाचे पुढारी म्हणून अशी वक्तव्ये करतात, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Leader of Opposition in the Legislative Council
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
author img

By

Published : Oct 6, 2020, 4:55 PM IST

Updated : Oct 6, 2020, 5:11 PM IST

पुणे - अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री आहेत, की एका पक्षाचे नेते म्हणून वक्तव्ये करतात, असा प्रश्न पडतो अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांनी आता देशमुख यांना लक्ष केले आहे.

विरोधी पक्षनेते दरेकर यांनीही अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला. सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयचा रिपोर्ट आलेला नसताना एम्सने काही सांगितलेले नाही, मात्र अनिल देशमुख यांना प्रतिक्रिया देण्याची इतकी घाई का, त्यांना हे शोभत नाही. आपले अपयश झाकण्यासाठी ते असे विधान करत आहेत.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पत्रकारांशी बोलताना

गृहमंत्री हाथरसवर बोलतात मात्र महाराष्ट्रात रोज हाथरस होत आहे, त्यावर बोलायला यांना वेळ नाही. शेतकरी, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यावर यांना बोलायचं नाही. मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हे असे विधान करत असल्याची टीका दरेकर यांनी केली. राज्यकर्त्यांनी राज्य चालवावे वैयक्तिक एक-एक मुद्द्यावर टीका-टिपण्णी करणे योग्य नाही. या राज्यात एक प्रकारची अराजकता सुरू आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला घरात घुसून मारण्याची धमकी दिली. अशा मुजोर अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही दरेकर यांनी केली आहे.

Last Updated : Oct 6, 2020, 5:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.