ETV Bharat / city

संगमवाडी येथील क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारकाची जमीन समितीच्या ताब्यात - संगमवाडी क्रांतीगुरु लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारकाची जमीन

जागेची मोजणी व हद्द कायम केल्यानंतर पंचनामे करण्यात आले. पंच म्हणुन हजर असलेले भाऊसाहेब सोनावणे व रावसाहेब खंडागळे यांनी आणि जागेचे सर्व मालक हजर होते या सर्वांच्या सह्या झाल्या. काहिवेळातच सर्व सोपास्कार पार पाडुन जागेचा अधिकृतरित्या ताबा घेण्यात आला. यावेळी स्मारकाच्या जागेमध्ये काही अनाधिकृत शेड होती अध्यक्ष विजय बापु आणि समिती सदस्यांनी शेड मालकांना सदर शेड काढण्या बाबत विनंती केल्याने लोकांनी तात्काळ ही शेड काढुन घेतली. हा क्षण मातंग समाजाच्या लढ्यातला महत्वपुर्ण असुन स्मारकाच्या कामातला महत्वाचा टप्पा आहे.

land of krantiguru lahuji salve national monument at sangamwadi in possession of committee in pune
संगमवाडी येथील क्रंतिगुरू लहुजी साळवे राष्ट्रीय स्मारकाची जमीन समितीच्या ताब्यात
author img

By

Published : May 20, 2022, 3:16 PM IST

पुणे - मागील कित्येक वर्षापासून पुण्यातील संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाचा प्रश्न प्रलंबित होता. काही दिवसापूर्वी विजय डाकले यांच्या पाठपुराव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या स्मारकाच्या जमीन अधिग्रहणासाठी 87 कोटी रुपयाची तरतूद केली होती. त्याचाच पुढील भाग म्हणून गुरुवारी भूसंपादन निवाडा प्रशासनाने जागा मालक, स्मारक समिती, महापालिका अधिकारी, पंच यांच्या उपस्थितीत स्मारकाची साडे पाच एकर जागा ताब्यात घेतली. लवकरच लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे काम लवकरच सुरू होईल, असा विश्वास महाराष्ट्र शासनाच्या लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांनी व्यक्त केला.

कायदेशीर सोपास्कार पूर्ण - पुणे शहरात होणाऱ्या आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या भव्यदिव्य नियोजित स्मारकाच्या कामातील महत्वाचा टप्पा गुरुवारी पार पडला. २९/४/२०२२ रोजी भुसंपादन निवाडा प्रशासनाने जाहीर केला होता. त्याची मुदत संपताच प्रशासन आणि स्मारक शासकिय समिती यांनी संयुक्तरित्या कायदेशीर सोपास्कार पार पाडले आणि जागा ताब्यात घेतली. सकाळीच शासकिय समितीचे अध्यक्ष विजयबापु डाकले, सदस्य बाळासाहेब भांडे, रवि पाटोळे, रामभाऊ कसवे, तसेच पालिकेच्या भवन रचना, मालमत्ता विभाग, भुसंपादन विभाग, नगर भुमापन अधिकारी -२, विशेष भुसंपादन अधिकारी -१५ या विभागाचे वरिष्ठ अधिकारी स्मारकासाठीची आरक्षित असलेली साडे पाच एकर जागा ताब्यात घेण्यासाठी हजर होते. जागेची मोजणी व हद्द कायम केल्यानंतर पंचनामे करण्यात आले. पंच म्हणुन हजर असलेले भाऊसाहेब सोनावणे व रावसाहेब खंडागळे यांनी आणि जागेचे सर्व मालक हजर होते या सर्वांच्या सह्या झाल्या. काहिवेळातच सर्व सोपास्कार पार पाडुन जागेचा अधिकृतरित्या ताबा घेण्यात आला. यावेळी स्मारकाच्या जागेमध्ये काही अनाधिकृत शेड होती अध्यक्ष विजय बापु आणि समिती सदस्यांनी शेड मालकांना सदर शेड काढण्या बाबत विनंती केल्याने लोकांनी तात्काळ ही शेड काढुन घेतली. हा क्षण मातंग समाजाच्या लढ्यातला महत्वपुर्ण असुन स्मारकाच्या कामातला महत्वाचा टप्पा आहे.

या संघटना होत्या आग्रही - या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्यातील विविध दलीत संघटना व मातंग समाज बऱ्याच वर्षा पासून आग्रही होते. ते काम लवकरच सुरू होणार असल्याने सर्वत्र समाज बांधव आणि पुणेकर नागरिक अतिशय समाधान व्यक्त करीत आहेत.त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातील दलीत ,मातंग समाज आणि पुणेकर नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे डाकले यांनी यावेळी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.