ETV Bharat / city

पुणे जिल्ह्यातील 'या' गावाने घातलाय चिनी वस्तूंवर बहिष्कार - कोंढवे-धावडे गावाचा चिनी वस्तूंवर बहिष्कार

कोंढवे-धावडे या गावातील दुकानदार, व्यापारी वर्ग यांना ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी पत्र देऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण गावात बॅनर लावून, दवंडी देऊन चायनीज वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आले.

Kondwe Dhavade village in Pune district boycotted Chinese goods
कोंढवे-धावडे गावाचा चिनी वस्तूंवर बहिष्कार
author img

By

Published : Jun 25, 2020, 8:02 PM IST

पुणे - चीनने भारतीय जवानांवर केलेल्या भ्याड हल्ल्यात 20 जवानांना वीरमरण आले. तर चीनच्याही काही सैनिकांना भारतीय जवानांनी ठार मारले. यानंतर दोन्ही देशातील संबंध विकोपाला गेले असून चिनी वस्तूंवर टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याआधी पुण्यात याच विषयावर आंदोलनंही करण्यात आले. त्यावेळी चायनीज मोबाईल, टीव्ही या वस्तूंची तोडफोड करण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील कोंढवे-धावडे गावाने यापुढे एक पाऊल जात, गावात चिनी वस्तू वापरणार नसल्याचा निर्धार केला. गावातील ग्रामपंचायतच्या वतीने तसा ठराव करण्यात आला आहे. तसेच येत्या एक जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील कोंढवे धावडे गावाने घातलाय चिनी वस्तूंवर बहिष्कार...

हेही वाचा... मालेगावातील जवानाला गलवान खोऱ्यात वीरमरण

कोंढवे-धावडे या गावातील दुकानदार, व्यापारी वर्ग यांना ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी पत्र देऊन चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण गावात बॅनर लावून, दवंडी देऊन चायनीज वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचेही ग्रामपंचायतच्या वतीने सांगण्यात आले. याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य (संगणक/ स्टेशनरी/कटलरी हे भारतीय बनावटीचे वापरण्यात येणार आहेत. ग्रामपंचायतीमार्फत अथवा शासनाने मंजूर केलेल्या कोणत्याही कामासाठी चायनीज वस्तूचा वापर केला जाऊ नये, असे निर्देशही ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले आहे.

पुण्यालगत असलेल्या या कोंढवे-धावडे या गावची लोकसंख्या अंदाजे 15 हजार इतकी आहे. गावात अनेक दुकाने आहेत. यापूर्वी खरेदी केलेल्या वस्तू विकण्याची मुभा येथील विक्रेत्यांना देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र कुठल्याही चायना वस्तू खरेदी करून त्याची विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोंढवे-धावडे या गावचे सरपंच नितीन धावडे याविषयी बोलताना म्हणाले की, हे शक्य होईल की नाही. हे आताच सांगता येणार नाही. परंतु, कुठूनतरी याची सुरवात झाली पाहिजे. हा विचार करून आम्ही हा ठराव केला. त्याला इतर सदस्यांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार येत्या 1 जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.