पुणे : पुण्यासह राज्यभरात एनआयए आणि एटीएस कडून छापेमारी करत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ( Popular Front of India ) अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. याच्या निषेधार्थ पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्र सरकारच्या यंत्रणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या घोषणाबाजी दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे ( Pakistan Zindabad Slogan Video Viral ) लावण्यात आले होते. या प्रकरणी पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आत्ता या प्रकरणी आयबीच्या वतीने 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
6 जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात : पर्वा पुणे पोलिसांच्या वतीने या प्रकरणी कलम 153, 124, 109, 120 ब हे कलम नव्याने ऍड करण्यात आले होते आणि आज सकाळीच कोंढवा येथून 6 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. थोड्याच वेळात पुणे पोलिसांच्या वतीने या 6 जणांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
देशद्रोहाचा गुन्हा दाखल : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणामुळे वातावरण तापले असताना पुणे पोलीस मात्र संभ्रमात आहेत. काही वेळापूर्वी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असल्याच स्पष्ट केले. मात्र आता पुणे पोलिसांनी 124 कलम या गुन्ह्यातून हटविल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते कलम लागत नाही. त्यामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुणे पोलीसाकडून देण्यात आली आहे.
आयबीची कसून चौकशी : या प्रकरणी अब्दुल बनसाल माजी अध्यक्ष एसडीपीआय, ऐनुल मोमीन माजी जिल्हा अध्यक्ष पिएफआय, काशीफ शेख, स्टेट पिएफआय मेंबर, दिलावर सय्यद, उपाध्यक्ष एसडीपीआय, माझ शेख पीएफआय फिझिक शिक्षक आणि मोहम्मद कैस पी एफ आय अध्यक्ष यांना पुणे पोलिसांनी चौकशी साठी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची कोंढवा पोलिस स्थानकात आयबीचे आधिकारी कसून चौकशी करत आहेत. दरम्यान, जिल्हाधीकारी कार्यालयासमोरील आंदोलनाप्रकरणी देखील पोलिस चौकशी करत असल्याचे माहिती सूत्रांनी दिली