ETV Bharat / city

एल्गार परिषदेला परवानगी दिल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार - कोळसे पाटील

पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजनाला परवानगी दिली आहे. येत्या 30 जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होणार आहे.

माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील
author img

By

Published : Jan 24, 2021, 7:45 PM IST

पुणे - पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेच्या आयोजनाला परवानगी दिली आहे. येत्या 30 जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होणार आहे. यापूर्वी निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी 31 डिसेंबर 2020 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. एल्गार परिषदेला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिल्याबद्दल त्याचे आभार करतो, अस मत माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील
एल्गार परिषदेला फुकट बदनाम केले-एल्गार परिषदेला जेवढ बदनाम केलं आहे. तेवढी बदनाम करण्यासारखी नाही. एक जानेवारीला भिमा कोरेगांवला जो समारंभ असतो. त्या समारंभाच्या निमित्ताने देशभरातून संविधानवादी,आंबेडकरवादी,लोकशाहीवादी जे तरुण येतात त्या तरुणांना या देशाचं राजकारण कस असावं, याच प्रबोधन करण्यासाठी 31 डिसेंबरला एल्गार परिषदेचं आयोजन केलं जात असतं. 2017 साली शनिवार वाडा येथे घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेला फुकट बदनाम करण्यात आलं आहे, असही यावेळी माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील म्हणाले.विकासासाठी राजकारण केलं पाहिजे- आम्ही पाहिल्यापासूनच सांगत अहो की अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या भवती राजकारण फिरलं पाहिजे. यात हिंदू-मुस्लिम, लव्ह जिहाद, भारत - पाकिस्तान, अशे विषय येता कामा नये. आमच्या विकासासाठी राजकारण केलं पाहिजे. हे राजकारण कळावं म्हणून एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात येत असते.

एल्गार परिषदेसाठी 31 डिसेंबरला मागितली होती परवानगी-

31डिसेंबर 2020 एल्गार परिषद आयोजित करण्याचा आयोजकांचा प्रयत्न होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यानंतर पुन्हा आयोजकांनी पत्रकार परिषद घेत जर 30 जानेवारीला एल्गार परिषद आयोजनाची परवानगी नाकारली तर रस्त्यावर परिषद घेऊ, असा इशारा दिला होता. अखेर आयोजकांना परवानगी मिळाली आहे.

हेही वाचा- कोणी मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचा खासगी सावकारांना सज्जड दम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.