ETV Bharat / city

जागतिक ओझोन दिन विशेष : 16 सप्टेंबरला ओझोन दिन का साजरा करतात, जाणून घ्या इतिहास

ओझोन वायूचा थर सूर्यकिरणांमधील सजीव आणि पृथ्वीसाठी हानिकारक अतिनील किरण आणि इतर तीव्र किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. यामुळे पृथ्वीवरील जीवन जपण्यास मदत होते.

world ozone day special
world ozone day special
author img

By

Published : Sep 16, 2021, 1:19 PM IST

पुणे - दिवसेंदिवस विरळ होत चाललेल्या ओझोन आवरणाविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि ओझोच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य उपाय शोधण्यासाठी 'जागतिक ओझोन दिन' दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा होतो. ओझोन वायूचा थर सूर्यकिरणांमधील सजीव आणि पृथ्वीसाठी हानिकारक अतिनील किरण आणि इतर तीव्र किरणांपासून पृथ्वीचे रक्षण करतो. यामुळे पृथ्वीवरील जीवन जपण्यास मदत होते.

हे पृथ्वीसाठी अतिशय उपयुक्त असलेले ओझोनचे आवरण कमी करणार्‍या किंवा क्षीण करणाऱ्या पदार्थांचा वापर टाळणे किंवा नियंत्रित करणे आवश्यक आहे. तरच, ओझोन थर आपल्यासह भविष्यातील पिढ्यांसाठीचेही संरक्षण करू शकेल. जागतिक हवामान बदल आणि उष्णतावाढीच्या पार्श्वभूमीवर ओझोनचे आवरण वाचवण्यासाठी अधिकाधिक सक्रिय प्रयासांची गरज आहे. यंदा म्हणजेच 2020 साली आपण जागतिक ओझोन आवरण वाचवण्याच्या प्रयासांचे 36 वे वर्ष साजरे करत आहोत. मागील 36 वर्षांत ओझोन वायूचे आवरण वाचवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

प्रतिक्रिया

जागतिक ओझोन दिवसाचा इतिहास :

ओझोन थर कमी होत असल्याच्या बाबीला वैज्ञानिक आधार मिळाल्याने आंतरराष्ट्रीय समुदायाला ओझोन थराच्या संरक्षणासाठी यंत्रणा तयार करणे भाग पडले. व्हिएन्ना परिषदेत ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचा औपचारिक निर्णय झाला. याला 28 देशांनी मान्यता दिली आणि 22 मार्च 1985 ला यासंबंधीच्या करारावर या सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या. सप्टेंबर 1987 मध्ये ओझोन लेअर कमी करणार्‍या पदार्थांवर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल तयार झाला.

• 16 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने ओझोन आवरणाच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून जाहीर केला.

• ओझोनचा थर वाचवण्यासाठीच्या प्रोटोकॉलवर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर तब्बल 30 वर्षांनी या आवरणाला छिद्र पडल्याचे समोर आले.वाहने, कारखाने आणि इतर कारणांनी उत्सर्जित होणाऱ्या हानिकारक रासायनिक वायूंमुळे ओझानवर विपरीत परिणाम होत आहे. हा परिणाम आणखी 50 ते 100 वर्षे चालू राहण्याची शक्यता आहे. या कारणाने या विषयाचा पर्यावरणाच्या अभ्यासात विविध अभ्यासक्रमांत समावेश करण्यात आला आहे.

• मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी 15 ऑक्टोबर 2016 मध्ये रवांडा येथील किगाली येथे 28 व्या बैठकीदरम्यान हायड्रोफ्लुरोकार्बनची पातळी खाली आणण्यासंबंधी करार केला. हा करार किगाली करार म्हणून ओळखला जातो.

ओझोन हा वातावरणाच्या दोन थरांमध्ये आढळतो -

ओझोन हा वातावरणाच्या मुख्यत: दोन थरांमध्ये आढळतो. जमिनीपासून 1५ ते ३० किलोमीटर पर्यंतचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर (troposphere) आणि तपांबराच्या वर 50 किलोमीटरपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर (stratosphere) एकूण प्रमाणाच्या 10 टक्के ओझोन तपांबरात तर 90 टक्के ओझोन स्थितांबरामध्ये आढळतो. स्थितांबरमधला ओझोनचा थर हा ‘ओझोन थर’ म्हणून ओळखला जातो. ओझोनचे प्रमाण विषुववृत्तीय प्रदेशावर कमी तर ध्रुवीय प्रदेशांवर सर्वाधिक असते.

ओझोनचे रक्षण करणे आपली जबाबदारी -

आज जागतिक ओझोन दिवस. ओझन हा इतर वायूप्रमाणेच निसर्गात आढळणारा एक नैसर्गिक वायू आहे. इतर वायू प्रमाणेच तो नैसर्गिक रित्या तयार ही होतो आणि नष्टही होतो. या ओझोनचा जमिनीपासून सुमारे १५ ते ३० किमी एक थर किंवा त्याचा जास्तीत जास्त प्रमाण या ठिकाणी आढळतो, ते साधारणता ९० टक्के आहे. हा ओझोन सूर्यपासून येणारे अतिनीलकिरणांपासून जे काही हानिकारक आहे. या अतिनीलकिरणांना रोखून एक आपल्या मानवजातीस उपकारक ठरतो. या अतिनीलकिरणांमुळे आपणास त्वचेचे विकार, कॅन्सर, ह्युमन सिस्टीम बिघडणे यांसारखे अनेक विकार होऊ शकतात. तथापि औद्योगिकीकरणामुळे वातावरणात उत्सर्जित होणारे विविध प्रकारचे गॅसेस, नॅट्रोजन आणि त्याचे ओक्ससाईड यामुळे या ओझोनचे विघटन होते. विघटन झाल्याने सूर्यापासून येणारे अतिनील किरणे रोखले जातात. त्यापृथ्वीवर आल्यास आपल्याला त्याची हानी होऊ शकते. तर असा हा उपकारक ओझोन जो समस्त प्राणिजातीस आणि मानवजातीस अतिशय उपकारक आहे, त्याच रक्षण करणे आपली जबाबदारी आहे, अशी माहिती असोसिएट व्हाईस प्रेसिडन्टचे डॉ.मोरे यांनी दिली.

तपांबरातील ओझोन आणि स्थितांबरातला ओझोन काय आहे -

तपांबरातील ओझोन हा प्रदूषक आहे. तपांबरामध्ये ओझोनचे प्रमाण वाढल्यास ते जंगलांच्या वाढीस मारक तसेच विविध श्वसनविकारांना आमंत्रण देणारे ठरू शकते. ओझोन हा हरितगृह वायू असल्यामुळे तो तपांबराचे व पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान वाढविण्यासही कारणीभूत होऊ शकतो. स्थितांबरातला ओझोन हा नैसर्गिकरीत्या दोन टप्प्यांमध्ये तयार होतो. पहिल्या टप्प्यांत सौरप्रारणांमुळे ऑक्सिजनच्या रेणूंचे (O2) विघटन होऊन ऑक्सिजनचे अणू (O+O) वेगळे होतात. दुसर्‍या टप्प्यामध्ये विघटित ऑक्सिजन अणूंचा (O) ऑक्सिजनच्या रेणूंशी (O2) संयोग होऊन ओझोनचे रेणू (O3) तयार होतात. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या ओझोनचा सौरप्रारणांमुळे व मानवनिर्मित रसायनांशी संयोग पावल्याने नाश होतो. सूर्यकिरणांतल्या अतिनील (UV) प्रारणांमुळे ओझोनच्या रेणूंचे विघटन होते आणि अशाप्रकारे ओझोनचा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो. अतिनील किरणे जमिनीपर्यंत पोहोचल्यास ती आपल्यासाठी हानीकारक असतात.

दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा -

मानवनिर्मित रसायनांमुळे अंटार्क्टिक स्थितांबरात ओझोनचे प्रमाण खूप कमी होण्याला ओझोन छिद्र असे म्हणतात. या ओझोन छिद्राची पहिली नोंद 1985 साली जे. सी. फार्मन, बी. जी. गार्डिनर आणि जे. डी. शांकलिन यांनी एका शोधनिबंधामध्ये केली. वातानुकूलन प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFC) वायूमुळे ओझोन थराचे नुकसान होते. 1990च्या दशकात जवळपास ओझोनच्या थरात 10 टक्के घट झाल्याचे दिसून आले होते. ओझोन थराच्या संरक्षणासाठी 16 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ओझोन थराच्या संरक्षणासाठी कॅनडाच्या मॉन्ट्रिएल शहरात जगभरातल्या प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. हा करार ओझोनच्या थरास हानीकारक ठरणार्‍या पदार्थांचा वापर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचा होता. या देशांनी क्लोरोफ्लोरोकार्बन्सच्या वापरावर निर्बंध घालण्याचे मान्य केले. 2000 सालापासून दर दशकात 3 टक्के इतकी ओझोनमध्ये सुधारणा झाली आहे.

काय करू शकतो उपाय -

यासाठी करण्यात येणारी उपाय म्हणजे गॅस, फ्रिज किंवा एअरकंडिशन असतील, त्यात क्लोरोकार्बन नावाचा एक गॅस वापरला जातो. तर ज्यात या क्लोरोकार्बन नावाचा गॅस आहे, असा गॅस असलेले वस्तू वापरणे टाळणे, शक्य तेवढा वाहनांचा प्रवास टाळावा. वाहनांमुळे होणारे प्रदुषण ओझोनसाठी घातक आहे. त्याशिवाय रासायनिक किटकनाशकांचा वापर थांबवायला हवा. मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करायला हवे.

हेही - तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.