पुणे- नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. त्यापासून निर्माण होणाऱ्या सगळ्या गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.
जागतिक नारळ दिन हा सर्वप्रथम 2009 साली एशिया-पॅसिफिक प्रदेश म्हणजे आशिया-प्रशांत महासागराच्या प्रदेशातील समुदायाकडून साजरा करण्यात आला. जागतिक स्तरावर नारळाच्या शेतीबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हा उद्देश जागतिक नारळ दिन साजरा करण्यामागे उद्देश्य आहे. त्यामुळे नारळाच्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकेल.
या ठिकाणी नारळाचे घेतले जाते उत्पादन
जगभरात नारळाचे उत्पादन घेतले जाते, पण आग्नेय आशियात त्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. नारळाच्या उत्पादनाच्या बाबतीत इंडोनेशियाचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारतातही कोकण किनारी, गुजरात पासून ते केरळपर्यंत आणि पूर्व किनाऱ्याच्या पश्चिम बंगालपासून ते तामिळनाडूपर्यंत नारळाचे उत्पादन घेतले जाते.
हेही वाचा-World War II : दुसऱ्या महायुद्धाला आज 76 वर्ष पूर्ण; आढावा घेणारी ही विशेष स्टोरी...
शाश्वत नारळ समुदाय निर्माण करण्याचे ध्येय-
जागतिक नारळ दिन साजरा करताना दरवर्षी एक संकल्पना आखली जाते. या वर्षीच्या जागतिक नारळ दिनाची संकल्पना ही Building a Safe Inclusive Resilient and Sustainable Coconut Community Amid COVID-19 Pandemic Beyond अशी आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतरच्या काळात एक शाश्वत नारळ समुदाय निर्माण करण्याचे ध्येय आहे.
हेही वाचा-भारत-पाक सीमेवरून घुसखोरी करणाऱ्याला तस्कराला बीएसएफकडून अटक
नारळाचे फायदे-
- अगदी तहान भागवण्यापासून ते फर्निचर तयार करण्यापर्यंत नारळाचे असंख्य असे फायदे आहेत.
- नारळामध्ये कार्बोहायड्रेट्स, मॅगनिज आणि प्रोटिन मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच आजारी व्यक्तींना नारळाचे पाणी प्यायचा सल्ला दिला जातो.
- नारळाचे दुध आणि तेल हे आपल्या त्वचेला ग्लो आणण्यासाठी फायदेशीर आहे.
- नारळामध्ये आयर्न आणि सेलेनियम असते. ते एक अॅन्टिऑक्सिडन्ट स्वरुपात काम करते. त्यामुळे लाल रक्त पेशींचे संरक्षण होते.
- नारळ खाल्याने कोलेस्टोरॉलचा स्तर सुधारतो.
- नारळात व्हिटॅमिन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक असतात. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात येतो.
- नारळाचे पाणी रोज पिल्यास शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर राहते.
भारतात, नारळ विकास मंडळाच्या वतीने देशभरातील विविध नारळ उत्पादक राज्यांमध्ये दरवर्षी जागतिक नारळ दिन साजरा केला जातो. नारळ पिकामधील गुंतवणुकीला आणि उत्पादनाला प्रोत्साहन देऊन गरिबीशी लढा देण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. तसेच, नारळाचे महत्त्व पसरविणे आणि नारळ उद्योगाच्या विकासास चालना देणे हेही याचे उद्दीष्ट आहे.
हेही वाचा-तालिबानबाबत भारताने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे- असदुद्दीन ओवैसी
भारताची स्थिती -
नारळ उत्पादनात भारत आघाडीवर आहे . जगातील प्रमुख नारळ उत्पादक देशांमध्ये आणि नारळ पिकांतर्गत क्षेत्रात भारताचे तिसरे स्थान आहे. देशीतील नारळाचे वार्षिक उत्पादन 2395 कोटी आहे. तर, पिकांतर्गत क्षेत्र 20.82 लाख हेक्टर आहे. प्रतिहेक्टरी 11 हजार 505 नारळांचे उत्पादन होते. देशाच्या सकल उत्पादनात नारळांचा वाटा 27 हजार 900 कोटी रुपयांचा आहे. 2016-17 मध्ये 2084 कोटी रुपयांच्या नारळाची निर्यात करण्यात आली. देशातील एक कोटींहून अधिक जनता रोजीरोटीसाठी नारळ पिकावर अवलंबून आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा ही राज्ये नारळाची प्रमुख उत्पादक आहेत.
केरळ हे भारतातील नारळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे. देशातील एकूण नारळ उत्पादनात याचा सुमारे 45 टक्के वाटा आहे. नारळाच्या खोबऱ्यापासून नारळ तेल मिळते. नारळाच्या उत्पादनाखालील क्षेत्र देशात सर्वाधिक असल्याने केरळ पुन्हा एकदा खोबरेल तेलाच्या बाबतीतही देशांतील सर्व राज्यांमध्ये प्रथम स्थानावर आहे.
नारळ उत्पादनांची निर्यात
- सक्रीय कार्बन, शुद्ध नारळ तेल, नारळ तेल, कोरडे नारळ, निरुपयोगी नारळ, खोबरे, नारळ बाह्य आवरणाचा कोळसा इत्यादी मुख्य नारळ उत्पादनांची निर्यात केली जाते.
- नारळ उत्पादनांच्या निर्यातीतील 45% वाटा सक्रिय कार्बनचा आहे. 2015-16 मध्ये पहिल्या दहा महिन्यांत भारताने 531.78 कोटी रुपयांच्या 51644.61 टन सक्रिय कार्बनची निर्यात केली. भारतातून निर्यात झालेल्या सक्रिय कार्बनपैकी सुमारे 32% कार्बन युरोपियन महासंघातील देशांमध्ये आणि सुमारे 28% कार्बन अमेरिकेला निर्यात करण्यात आला.
- भारतातून निर्यात करण्यात येणाऱ्या नारळ तेलापैकी 51% हून जास्त तेल आखाती देशांना पाठवले जाते. तर, सुमारे 69% शुद्ध नारळ तेल अमेरिकेला पाठवले जाते. सध्या नारळ भारताच्या निर्यात उत्पन्नाच्या 10% हून अधिक वाटा उचलतो. भारताने 31191.73 टन नारळांची नुकतीच निर्यात केली. त्यापैकी 63% पेक्षा जास्त निर्यात आखाती देशांना करण्यात आली.