पुणे - भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर अजून एक आरोप ( kirit Somaiya Criticized Thackeray Government ) केला आहे. कोरोना काळात पुणे, मुंबई, ठाणे आणि कल्याण येथील ज्या कोविड सेंटरला कंत्राट देण्यात आले होते. त्या कंपन्या अस्तित्वात नाहीत. ज्यांना हे कंत्राट दिले होते ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा आणि उजवा हात असून, लवकरच पुराव्यांसह नाव जाहीर करेल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या ( Kirit Somaiya On Cm Uddhav Thackeray ) यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
किरीट सोमय्या म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी कोरोना कालावधीत कमाई करण्यासाठी मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे परिसरात कोविड सेंटर सुरु केले. या कोविड सेंटरमध्ये घोटाळा करण्यात आला असून, कोरोना दरम्यान नागरिकांच्या जीवाशी खेळण्यात आले. ज्या बेनामी कंपन्यांना कंत्राट दिले गेले ते उद्धव ठाकरे यांचा उजवा आणि डावा हात असल्याचा आरोपही त्यांनी ( kirit Somaiya Criticized Uddhav Thackeray ) केला."
गुन्हा दाखल करणार
कोरोनाच्या पहिल्या लाटेत पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आले होते, त्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. तसेच, राज्यातील 8 कोविड सेंटर ज्या बेनामी कंपन्यांना देण्यात आले, त्यांची चौकशी करण्यासाठी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी ( kirit somaiya on governor bhagtsingh koshyari ) यांची भेट घेणार असल्याची माहिती सोमय्या यांनी यावेळी बोलताना दिली.
हेही वाचा - Nagar Panchayat Election 2022 : 'आर्थिक बळावर जागा जिंकल्या...'; दीपक केसरकरांचा भाजपावर घणाघात