पुणे : पुण्यातील नाना पेठ येथे काल मध्यरात्री एक धक्कादायक प्रकार घडला. नाना पेठ नवा वाडा (at Nana Peth in Pune) परिसरात मध्यरात्री एका तरुणाची (at Nana Peth in Pune) हत्या करण्यात आली आहे. यावेळी चाकूने तरुणाला भोसकण्यात आले. त्यानंतर त्याच्या डोक्यात सिमेंटचे ब्लाक घालून त्याला ठार मारण्यात आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. . या हत्येप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा (Police have registered a case of murder) दाखल करण्यात आहे. सध्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून (Police are searching for the unknown assailants) घेतला जातो आहे. तसेच हत्या करण्यात आलेला तरुण कोण होता, याचीही ओळख पटवण्यात आली आहे. अक्षय वल्ल्याळ ( वय 28 वर्ष ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अक्षय लक्ष्मण वल्ल्याळ असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमन्स्यातुन या तरुणाची हत्या करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. या हत्येप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. समर्थ पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. दोघा संशयितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयच्या मारेकऱ्यांचा कसून शोध घेतला जातोय.
नाना पेठ परिसरातीत सीसीटीव्ही फुटेजची मदत पोलिसांकडून आता घेतली जाते आहे. नेमक या हत्येचं कारण काय? हत्येला जबाबदार कोण? अक्षयचे कुणाशी भांडण झाले होतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं काम पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे.
हेही वाचा : Mumbai Crime News : वर्सोव्यात बस डेपोमध्ये एका व्यक्तीची पेव्हर ब्लॉकने ठेचून हत्या