ETV Bharat / city

'त्या' भीषण हत्याकांडातून वाचला जोगिंदर, जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना देणार शिक्षण

या भीषण हल्ल्याची तेव्हा देशभर चर्चा झाली होती. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी जोगीच्या कुटुंबातून बचावलेल्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. छोट्या जोगिंदरला तेव्हा जम्मूच्या एका शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले.

त्या भीषण हत्याकांडातुन वाचला जोगिंदर
author img

By

Published : Jul 25, 2019, 8:59 PM IST

पुणे - जम्मूच्या दोडा जिल्ह्यात 19 जुलै 1999 सालच्या एका रात्री हिजबुल कमांडरच्या दहशतवाद्यांनी एक भयंकर रक्तपात घडवून आणला. एकाच कुटुंबातील 15 जणांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील इतके लोक मारले जाण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. जोगिंदरचे कुटुंबीय ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य होते. त्यामुळे त्यांच्याकडेही बंदुका होत्या. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. तीन दहशतवाद्यांना ठारही मारले. परंतु अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांचा समोर त्यांचा निभाव लागला नाही. या घटनेत जोगिंदरच्या कुटुंबियातील १५ जण ठार झाले होते. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यातून तेव्हा ४ वर्षांचा जोगिंदरसिंग बचावला होता. हाच जोगिंदरसिंग सध्या पुण्यात राहतो. पुण्यातील 'सरहद' या संस्थेत राहून तो शिक्षण घेत आहे.

त्या भीषण हत्याकांडातून वाचला जोगिंदर

या भीषण हल्ल्याची तेव्हा देशभर चर्चा झाली होती. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी जोगीच्या कुटुंबातून बचावलेल्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. छोट्या जोगिंदरला तेव्हा जम्मूच्या एका शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले. तिथे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी त्याला पुण्याच्या सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या ताब्यात सोपवले आणि त्याच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची विनंती केली. तेव्हापासून जोगिंदर पुण्यात आहे. त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. यादरम्यान तो जम्मूकाश्मीरच्या तत्कालीन राज्यपालांना भेटला. या भेटीत त्याला चांगल्या नोकरीचे आश्वासन देण्यात आले, पण अजूनही हे आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही.

कुटुंबाविषयी झालेल्या दुर्घटनेनंतर सुरुवातीला त्याच्याही मनात होते की, आपण सैन्यात जावे आणि झालेल्या घटनेचा बदला घ्यावा. मात्र, मधल्या काळात त्याने आयुष्य पाहिले आणि मग आपली मदत शत्रूला होऊ नये यासाठी त्यानी पुढाकार घेतला. आता तो म्हणतो, मला अशी नोकरी पाहिजे ज्याद्वारे मी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना शिक्षणासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करू शकेन.

सरहद संस्थेनेही आता जम्मू-काश्मीरमध्ये एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. 'हर घर स्कूल' असे या उपक्रमाला नाव दिले आहे. या उपक्रमाचा चेहरा म्हणून जोगिंदरची निवड करण्यात आली आहे. जेणेकरून जम्मू-काश्मीर खोऱ्यातील इतरही नागरिक या उपक्रमाशी जोडले जातील.

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना संजय नहार म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील जी मुले शाळेत येऊ शकत नाहीत शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा मुलांच्या घरी शाळा स्वतः गेली पाहिजे. ज्या गावात दहा-वीस घरे असतील त्या गावात त्यातीलच एखाद्या घरात ही शाळा भरेल. या शाळेत कॉम्प्युटर सारख्या सुविधा असतील. तेथील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. आपल्या घरांनाच शाळा करूयात ही घोषणा घेऊन आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहोत. या उपक्रमाचा चेहरा असणार आहे जोगिंदर.

Intro:जम्मूच्या दोडा जिल्ह्यात 19 जुलै 1999 सालच्या एका रात्री हिजबुल कमांडरच्या दहशतवाद्यांनी एक भयंकर रक्तपात घडवून आणला. एकाच कुटुंबातील 15 जणांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारले होते. अशाप्रकारे एकाच कुटुंबातील इतके लोक मारले जाण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. जोगिंदरचे कुटुंबीय ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य होते त्यामुळे त्यांच्याकडेही बंदुका होत्या. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. तीन दहशतवाद्यांना ठारही मारले. परंतु अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या दहशतवाद्यांचा समोर त्यांचा निभाव लागला नाही. या घटनेत जोगिंदरच्या कुटुंबियातील पंधराजण ठार झाले होते. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यातून तेव्हा चार वर्षाचा जोगिंदरसिंग बचावला होता. हाच जोगिंदरसिंग सध्या पुण्यात राहतो..पुण्यातील 'सरहद' या संस्थेत राहून तो शिक्षण घेत आहे..

Body:
या भीषण हल्ल्याची तेव्हा देशभर चर्चा झाली होती. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी जोगीच्या कुटुंबातून बचावलेल्या सदस्यांची भेट घेतली आणि त्यांना संपूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं. छोट्या जोगिंदरला तेव्हा जम्मूच्या एका शाळेत शिक्षणासाठी ठेवण्यात आले. तिथे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी त्याला पुण्याच्या सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या ताब्यात सोपवलं आणि त्याच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची विनंती केली..तेव्हापासून जोगिंदर पुण्यात आहे आणि त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. यादरम्यान तो जम्मूकाश्मीरच्या तत्कालीन राज्यपालांना भेटला.. या भेटीत त्याला चांगल्या नोकरीचे आश्वासन देण्यात आले..पण अजूनही हे आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही...

Conclusion:कुटुंबाविषयी झालेल्या दुर्घटनेनंतर सुरुवातीला त्याच्याही मनात होते की आपण सैन्यात जावं आणि झालेल्या घटनेचा बदला घ्यावा पण मधल्या काळात त्याने आयुष्य पाहिलं आणि मग आपली मदत शत्रूला होऊ नये यासाठी त्यानी पुढाकार घेतला..आता तो म्हणतो, मला अशी नोकरी पाहिजे ज्याद्वारे मी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांना शिक्षणासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत करू शकेन..

सरहद संस्थेनेही आता जम्मू-काश्मीरमध्ये एक नवीन उपक्रम सुरू केलाय.. 'हर घर स्कूल' असे या उपक्रमाला नाव दिले आणि या उपक्रमाचा चेहरा म्हणून जोगिंदरची निवड केलीय.. जेणेकरून जम्मू काश्मीर खोऱ्यातील इतरही नागरिक या उपक्रमाशी जोडले जातील...

या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना संजय नहार म्हणाले जम्मू-काश्मीरमधील जी मुले शाळेत येऊ शकत नाहीत शिक्षण घेऊ शकत नाही अशा मुलांच्या घरी शाळा स्वतः गेली पाहीजे.. ज्या गावात दहा वीस घरी असतील त्या गावात त्यातीलच एखाद्या घरात ही शाळा भरेल...या शाळेत कम्प्युटर सारख्या सुविधा असतील...थेतील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल.. आपल्या घरांनाच शाळा करूयात ही घोषणा घेऊन आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये जाणार आहोत आणि या उपक्रमाचा चेहरा असणार आहे जोगिंदर...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.