ETV Bharat / city

Jayant Patil slammed BJP in Pune : चंद्रकांत पाटील हे फडणवीस यांच्या हितचिंतकाच्या यादीत नाहीत - जयंत पाटील - Jayant Patil slammed BJP in Pune

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील ( NCP leader Jayant Patil ) म्हणाले, की देशात भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र यावे हीच ( opposition parties unity against BJP ) आमची भूमिका आहे. कोणालाही सोबत न घेण्याचा आमचा विचार नाही. देशातील सर्व विरोधक एकत्र येणे गरजेचे आहे. राज्यसभेतील 12 खासदारांना निलंबित करणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने जर हुकूमशाही चालत असेल तर त्या विरोधात एकत्रित आले पाहिजेत.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Dec 4, 2021, 9:17 PM IST

Updated : Dec 4, 2021, 10:24 PM IST

पुणे- देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी काहीही घाई नाही. चंद्रकांतदादांना घाई झाली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे की त्यांच्या पक्षात त्यांचे कोण हितचिंतक आहेत ? असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ( Jayant Patil take Jibe at Chandrakant Patil ) चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

पुण्यातील सिंचन भवन येथे कुकडी कालवा सल्लागार समितीची ( Kukadi canal advisors committee in Pune ) बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी भाजप पक्षासह त्यांच्या नेत्यांवर टीका केली. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे म्हटले होते. यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करून आपण तिथे जाऊन बसू, असे कदाचित चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल. चंद्रकांतदादांना मुख्यमंत्री होण्याची घाई ( Chandrakant Patil in hurry to get chief minister post ) झाली आहे.

जयंत पाटील यांची भाजपवर टीका

हेही वाचा-Devendra Fadnavis Pune Development : पुणे देशात क्रमांक एकचे शहर बनवू -देवेंद्र फडणवीस

पुणेकर ऐकतील आणि भाजपला पाणी नक्की पाजवतील

पुण्याचा पाणी कोणीही पळवण्याचा प्रयत्न करू नये. जो पुण्याचे पाणी कमी करेल, त्याला पुणेकर पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली होती. त्यावर जलसंपदी मंत्री जयंत पाटील ( water resource minister Patil on Pune water ) यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, की पुण्याच्या पाण्याबाबत शिष्टमंडळाबाबत आज बैठक झाली आहे. पुण्याचे पाणी कमी करण्याचा प्रस्तावच नाही. तसा विचारदेखील नाही. जे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे, तसे पत्र फडणवीस यांच्या काळात 11 पत्रे देण्यात आली होती. पुण्याला पाणी मिळू नये, असे अनेक निर्णय आणि धोरण फडणवीस सरकारने केले. मात्र आमचा असा काहीच विचार नाही. भारतीय जनता पक्ष पुणेकरांना फक्त भीती दाखवत आहे. निवडणुका आल्या की भारतीय जनता पक्ष अशा स्थितीत भीती दाखवितच असते. पुणे शहरात समाविष्ट झालेल्या 23 गावांबाबत चर्चा झाली आहे. पुणेकरांना अधिक पाणी कसे मिळेल हाच आमचा प्रयत्न आहे, असेदेखील यावेळी पाटील म्हणाले.

हेही वाचा-जो पुण्याचे पाणी कमी करेल, पुणेकर त्याला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही - देवेंद्र फडणवीस

भाजप विरोधात सर्वजण एकत्र यावे, हीच आमची भूमिका

देशात भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र यावे हीच ( opposition parties unity against BJP ) आमची भूमिका आहे. कोणालाही सोबत न घेण्याचा आमचा विचार नाही. देशातील सर्व विरोधक एकत्र येणे गरजेचे आहे. राज्यसभेतील 12 खासदारांना निलंबित करणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने जर हुकूमशाही चालत असेल तर त्या विरोधात एकत्रित आले पाहिजेत.

हेही वाचा-MP Dr. Amol Kolhe Trolled : 'पेशव्यांच्या पराक्रमाबद्दल आदर पण...'; डॉ. अमोल कोल्हेंचे ट्वीट

साहित्य संमेलनात अशा पद्धतीने राजकारण नको -

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे सुरू झालेल्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यावर जयंत पाटील म्हणाले, की नाशिक ही कुसुमाग्रजांची भूमी आहे. कुसुमाग्रज यांच्या विरोधात जर फडणवीस यांची अशी भावना असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. हा संपूर्ण राज्याचा अपमान आहे. साहित्य संमेलनात अशा पद्धतीचे राजकारण नको, असेदेखील यावेळी पाटील म्हणाले.

Last Updated : Dec 4, 2021, 10:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.