मुंबई महाविकास आघाडीबाबत महत्त्वाची बातमी आहे. पुढील काही दिवसांमध्ये बैठक होऊन तिन्ही पक्षामध्ये स्थानिक पातळीवर आघाडी करण्यासंदर्भात मोठी पावले उचलली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ( NCP meating at silver oak ) दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सिल्वर ओक आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली ( Jayant Patil on Mahavikas Aghadi ) होती. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीच्या बैठकीला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, नेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीची काही ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते. या बैठकीत सध्या राज्यात सुरू असलेला राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. यासोबतच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्याच्या सूचनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना शरद पवार यांनी ( Sharad Pawar instruction on elections ) दिले आहेत.
शक्य असेल तिथे आघाडी करण्याचा प्रयत्न होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख यांच्यासोबत
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी लवकरच भाव विकास आघाडी मधील सर्वच पक्षांसोबत चर्चा केली जाणार आहे. या निवडणुकांसाठी चर्चा करण्याचे अधिकार जिल्हास्तरावरील नेत्यांना देखील दिले आहेत. शक्य असेल तिथे आघाडी करण्याचा प्रयत्न होणार असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना शरद पवार यांनी देखील दिले असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेनेसोबत काँग्रेसची नैसर्गिक युती नव्हती, अशा प्रकारचे वक्तव्य केले. यावरही बोलताना जयंत पाटील म्हणाले की, नाना पटोले आता मुंबईत नाहीत. मात्र मुंबईत आल्यानंतर या विषयावर नाना पटोले यांच्याशी चर्चा केली जाईल. या चर्चेनंतर नक्कीच नाना पटोले हेदेखील पुन्हा एकदा महा विकास आघाडीच्या विचारात सोबतच पुढे जातील. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची ही भूमिका महाविकासआघाडी सोबत जाण्याचीच असल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
सप्टेंबरमध्ये राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय अधिवेशन गणपती सण साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजन करण्यात येणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ते राज्यस्तरीय अधिवेशन असेल. या अधिवेशनाची तयारी बाबत देखील शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बोलावलेल्या बैठकीत चर्चा केली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितला आहे.
एकनाथ शिंदे गटात तीव्र नाराजी सरकारमधील शिंदे गटात तीव्र नाराजी नवीन सरकार स्थापन झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत शिवसेनेच्या एका गटाला घेऊन भारतीय जनता पक्ष सोबत सरकार स्थापन केले. मात्र सध्या भारतीय जनता पक्षात नाराजी उघडपणे दिसत नसली तरी एकनाथ शिंदे गटात तीव्र नाराजी असल्याचं समोर येत आहे. सत्ता मिळवण्यासाठी हा गट तयार झालेला आहे त्यामुळे सत्ता मिळाली नाही तर नाराजीही राहणारच असा चिमटा जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काढला.
हेही वाचा-Mumbai Crime News खारमधील शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये हवेत गोळीबार, धमकीचे पत्र टाकून हल्लेखोर पसार