ETV Bharat / city

Jayant Patil Criticized Chandrakant Patil : 'चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील, तर त्यांच्यासोबत मीही जाईन' - चंद्रकांत पाटील हिमालय वक्तव्य

'कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक हरलो, तर हिमालयात जाणार', असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Statement On Kolhapur North By Election ) यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil Criticized Chandrakant Patil ) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक टीका केली आहे.

Jayant Patil Criticized Chandrakant Patil

author img

By

Published : Apr 16, 2022, 5:16 PM IST

पुणे - 'कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक हरलो, तर हिमालयात जाणार', असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil Statement On Kolhapur North By Election ) यांनी केला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ( Jayant Patil Criticized Chandrakant Patil ) विचारलं असता ते म्हणाले की, 'पराभव झाला तर हिमालयात जाईन, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता ते हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन, माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत.' असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.

राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - कोल्हापूर पोट निवडणुकीचा जसा तुम्हाला आनंद झाला आहे. तसा मला देखील झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकसंघ पद्धतीने काम केल आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करतात. त्यांना ही चपराक मिळाली आहे. असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

'आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही' - राज्यात दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु, आम्ही खंबीर आहोत. प्रत्येकाची श्रध्दा असते. आम्हीदेखील प्रभू रामांना मानतो. आमच्यातही हिंदुत्वाचा भाग आहे. परंतु, आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करत नाही. फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या विचारांचे आमच्यावर संस्कार आहेत. तसेच राज ठाकरे यांना 30 वर्षे यांना हनुमान चालिसा आठवली नाही. भाजप जे सांगत आहेत. ते राज ठाकरे करत आहेत, अशी टीका देखील यावेळी जयंत पाटील यांनी केली.

हेही वाचा - Kolhapur North By Election Result : चंद्रकांत पाटील यांना आता पश्चात्ताप होत असेल; विजयानंतर जयश्री जाधव यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.