ETV Bharat / city

Piff 2022 : 'देशात आरोग्याचा प्रश्न गंभीर ,केंद्र आणि राज्य सरकारकडून काम होणे गरजेचे' - जावेद अख्तर - जब्बार पटेलांशी बातचीत

ओटीटी हे खूप चांगले सर्जनशील माध्यम आहे.त्याचा प्रेक्षक आणि चित्रपट तयार करणाऱ्या दोघांनाही उपयोग होत आहे. काही विषय असे असतात, की जे दोन तासांच्या चित्रपटातून मांडता येत नाहीत. त्यासाठी अनेक भाग गरजेचे असतात. अशा वेळी ओटीटी या माध्यमातून अनेक मोठे विषय दाखवता येतात,असेही जावेद अख्तर म्हणाले.

javed akhtar
javed akhtar
author img

By

Published : Mar 4, 2022, 7:12 PM IST

Updated : Mar 4, 2022, 7:48 PM IST

पुणे :- कोरोनामुळे सरकारने लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आरोग्याची काय परिस्थिती आहे. हे सर्वांनीच पाहिली आहे.ऑक्सिजन अभावी देशात अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. देशात आरोग्याचा प्रश्न हा गंभीर असून यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून काम व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर (Javed Aakhar in Piff 2022) यांनी व्यक्त केलं आहे.

javed akhtar
जावेद अख्तर यांच्याशी बातचीत

पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Piff 2022) महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जावेद अख्तर यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. 'ओटीटी हे खूप चांगले सर्जनशील माध्यम आहे.त्याचा प्रेक्षक आणि चित्रपट तयार करणाऱ्या दोघांनाही उपयोग होत आहे. काही विषय असे असतात, की जे दोन तासांच्या चित्रपटातून मांडता येत नाहीत. त्यासाठी अनेक भाग गरजेचे असतात. अशा वेळी ओटीटी या माध्यमातून अनेक मोठे विषय दाखवता येतात. ओटीटीमुळे खूप बोल्ड विषयांना हात घालता येतो. त्यामध्ये अनेक प्रयोग करता येतात. या पिढीकडे मोबाईल सारखी साधने असल्याने ते या पिढीचे माध्यम आहे.'

आत्ताच्या पिढीच्या गोष्टी बदलल्या

बदलता चित्रपट या विषयावर बोलताना अख्तर म्हणाले, की '५० च्या दशकातील नायक हा कामगार वर्गातून येणारा होता मात्र ९० च्या दशकात नायक हा कामगार वर्गातील नव्हता. त्याला या देशातील सामाजिक राजकीय परिस्थितीची पार्श्वभूमी आहे. आता पुन्हा गोष्टी बदलत आहे. छोट्या गावांतून चित्रपट येत आहेत. त्यामध्ये भारतातील या छोट्या गावांचे चित्रण आहे आणि हे चित्रपट मोठ्या शहरातील लोक मल्टिफ्लेक्समध्ये बघत आहेत. ते पुढे म्हणाले, ९० च्या दशकात परिस्थिती बदलली. आत्ताच्या पिढीच्या गोष्टी बदलल्या, त्यांना प्रश्न पडू लागले की आम्ही कोण आहोत. त्यांची जिज्ञासा त्यांना पुढे घेऊन गेली. या पिढीचे सामाजिक भान खूप चांगले आहे. आता बदलत्या वेळेप्रमाणे चित्रपट अधिक चांगले होत आहेत. मला भविष्याकडून आशा आहे.'

विजय तेंडुलकर हे भारतातील सर्वश्रेष्ठ नाटककार'

आपण एक देश म्हणून चित्रपटांवर प्रेम करतो. ते प्रेम आपल्या हजारो वर्षांच्या अनेकविध कलांमधून आले आहे. आपण गाण्यांसह चित्रपट बघणे पसंत करतो आणि यामध्ये भाषा महत्त्वाची आहे. भारतामध्ये अनेकविध भाषा आणि कला आहेत आणि आपण त्याचा आस्वाद घेण्यासाठी भाषेच्या भिंती ओलांडून जायला हवे. इंग्रजी आलेच पाहिजे पण मातृभाषेला पर्याय नाही. मातृभाषेशिवाय तुमचे अस्तित्व नाही. मातृभाषा येत नसेल, तर जमिनीशी तुमचे नाते संपते. आम्ही मुंबईत आल्यानंतर आम्हाला समजले की मराठीमध्ये किती समृद्ध ज्ञान आहे आणि माझ्यामते विजय तेंडुलकर हे भारतातील सर्वश्रेष्ठ नाटककार आहेत.अस यावेळी अख्तर म्हणाले. ज्यांच्याकडे समृद्ध भाषा नसते ते लेखक चित्रपटात शिव्यांचा वापर करतात,' असेही जावेद अख्तर म्हणाले.

हेही वाचा - आमिर खानच्या सांगण्यावरून 'झुंड' चित्रपट केला, अमिताभचा खुलासा

आमचे शेतकऱ्यांचे रक्त आहे
'आमच्या पिढीच्या प्रायोरिटी वेगळ्या होत्या. आम्ही संपत्ती मिळवण्याच्या मागे होतो. आम्ही कला संस्कृती आमच्या मुलांना शिकवल्या नाहीत. आमच्या भाषांमधील म्हणी, वाक्प्रचार, दोहे हे ज्ञान आहे, हे आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांना दिलेच नाही. आम्ही समाज म्हणून एकाच वेळी सर्वांत जुना आणि सर्वांत तरुण आहोत. हा समाज अनेक छोट्या मोठ्या अतिजहाल गोष्टी घडल्याने बदलत गोष्ट बदलत नाही. आमचे शेतकऱ्यांचे रक्त आहे आणि ते कट्टर नाही. लुटारू नाही. दोन तीन दशकांमध्ये काही घडले, की हा देश उध्वस्त होत नाही. तो पुढारलेला आहे आणि दोन-तीन दशकांपेक्षा मोठा आहे, असेही अख्तर म्हणाले.

धर्मांधता असलेले चित्रपट बनवले जातात
आजच्या चित्रपटातील जातीयवाद आणि धर्मांधता याविषयी बोलताना ते म्हणाले, 'ज्यांना चित्रपटाशी नव्हे तर स्वतःच्या लोकांचे हितसंबंध जपायचे असतात. ते धर्मांधता असलेले चित्रपट बनवतात. ज्यांना आपले चित्रपट हिट आणि लोकप्रिय करायचे असतात ते असे करत नाहीत. आणि ज्यांना आपले अस्तित्त्व दाखवायचे असते आणि ज्यांनी आयुष्यात काहीच केलेले नसते ते, कसलेतरी कारण काढून चित्रपटांना विरोध करतात. सरकारने चित्रपटाला निधी देण्यापेक्षा ते प्रदर्शित कसे होतील, याकडे लक्ष दिले पाहिजे. जास्तीत जास्त चित्रपटगृहे तयार केले पाहिजेत. त्यामुळे चांगल्या चित्रपटांना फायदा होईल,' असेही अख्तर म्हणाले.

दिग्दर्शक होण्यासाठी आलो मुंबईत
यावेळी अख्तर यांनी आपला चित्रपट क्षेत्रातील प्रवास कसा सुरु झाला हेही यावेळी सांगितले. ते म्हणाले, “मी खरे तर दिग्दर्शक बनण्यासाठी मुंबईला आलो, पण लेखक झालो. मला गुरुदत्त यांच्याबरोबर काम करायचे होते, पण मी ऑक्टोंबर १९६४ मध्ये मुंबईत आलो आणि ४ दिवसांत गुरुदत्त यांचे निधन झाले.” आपल्यावर 'मदर इंडिया', 'गंगा जमना', 'जाल', 'श्री ४२०', 'गाईड', या चित्रपटांचा प्रभाव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - VIDEO : 'सरकार चांगल्या पद्धतीने काम करत असून मुलांना देशात आणणार' - ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर

Last Updated : Mar 4, 2022, 7:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.