पुणे - शिकण्याची इच्छा असेल तर जगातील कोणतीच गोष्ट अशक्य नाही, हे सिद्ध करुन दाखवल आहे पुण्यातील ईशानी ढोरे हिने केली आहे. 6 वर्षाच्या ईशानी ढोरे ( Ishani Dhore Pune ) हिने ५ मिनिटे आणि ३३ सेकंदात १०० गणिते सोडवून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये ( India Book of Records ) विक्रम नोंदवला आहे. पुण्यातील हडपसर येथील अॅमनोरा पब्लिक स्कूलमधील इयत्ता पहिलीमध्ये शिकते. ईशानी ढोरे हीने ५ मिनिटे आणि ३३ सेकंदात १०० गणिते सोडवून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये विक्रम नोंदवला आहे.
100 गणिते फक्त साडे 3 मिनिटात : ईशानी ही हडपसर येथील रहिवासी आहे. ईशानीने अबॅकसचे प्रशिक्षण तिची आई श्वेता ढोरे यांच्याकडूनच घेतले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष शाळा, महाविद्यालय बंद होते. आपल्या मुलाचे शिक्षण बुडू नये, यासाठी तिची आई श्वेता ढोरे हे ईशानीला घरातच शिकवायला लागले. काही दिवसांनी जेव्हा ईशानी अबॅकस शिकायला लागली आणि त्याच मन त्यात लागायला लागले. श्वेता ढेरे यांनी तिला विविध गणिते सोडवायची शिकवले. तिने ५ मिनिटे आणि ३३ सेकंदात १०० गणिते सोडवून 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस'मध्ये विक्रम केला असला तरी ती आत्ता 100 गणिते फक्त साडे 3 मिनिटात सोडवते. एखादा मोठा हिशोब करताना आपल्या कॅलक्युलेटर ची गरज भासते. तेही वेळोवेळी हिशोब बरोबर आहे की नाही त्यासाठी कॅलक्युलेटर चेक करावं लागते. परंतु पुण्यातील ही लिटर कॅलक्युलेटर एकेरी गणिते कितीही मोठे असली तरी ती लगेच त्यांची उत्तरे बरोबर देत आहे. ईशानी या गुणांचा सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.