पुणे - पुणे फिल्म फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या इंटरनॅशनल शॉर्टस कलेक्टिव्ह या लघुपट मोहत्सवात पुणेकर चित्रपट रसिकांना समीक्षकानी गौरविलेल्या फ्रान्स व जर्मनी या देशातील लघुपट पाहण्याची संधी मिळणार आहे.
येत्या शनिवार रविवार अर्थात १५ व १६ जून २०१९ ला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात होणार आहे. या महोत्सवात ट्रेस कोर्ट या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या प्रत्येकी ४ मिनीटाहुन कमी वेळेच्या तब्बल ६२ शॉर्ट फिल्म रसिकांना पाहता येणार आहेत. यामध्ये फिक्शन, ऍनिमेशन, डॉक्युमेंट्री यासारख्या अनेक प्रकारच्या लघुपटाचा समावेश असणार आहे. यामध्ये प्रेक्षकांसाठी एक स्पर्धा ठेवण्यात आलीय. यात प्रेक्षकाना आपली आवडीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी मते द्यायची आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा कर्टन रेझर म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवन अलायन्स फ्रांकॉइस आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय संस्था यांच्यावतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याची पिढी ही युट्युबवर व्यक्त होताना दिसते. आपल्या देशातील विविध समस्या विषय युवक हे मांडत असतात मात्र इतर देशांमधल्या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून कुठले विषय मांडले जात आहेत, कशा पद्धतीने हे विषय हाताळले जात आहेत या संदर्भातली माहिती या माध्यमातून पुण्यातल्या तरुणांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शॉर्ट फिल्म प्रेमी साठी ही एक पर्वणी ठरणार आहे