पुणे - अॅल्युमिनियमपासून निर्मित (Aluminium Body coaches) पहिली मेट्रो ट्रेन पुणे (Pune Metro) येथील प्रकल्पाकरिता शनिवारी रवाना करण्यात आली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारच्या अॅल्युमिनियम कोचचे निर्माण होत असून, याचा उपयोग महामेट्रोच्या पुणे प्रकल्पात होणार आहे. कोलकातामधील उत्तरपरा येथे टिटागड वॅगन्स या कंपनीतर्फे आयोजित सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे (महुआ) सचिव आणि महामेट्रोचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवत ट्रेन पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता रवानगी केली.
याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी जयदीप, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर उपस्थित होते. मनोज जोशी म्हणाले, 'देशाभरातील मेट्रो प्रकल्पांमुळे एक नवीन इको-सिस्टीम निर्मित होत आहे. अॅल्युमिनियम कोचच्या निर्मितीमुळे यापुढे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होत आहे.'
डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, 'वजनाने हलक्या असलेला मेट्रोच्या कोचचे निर्माण होणे आणि त्याचा मेट्रो प्रकल्पाकरता वापर होणे ही संपूर्ण देशाकरता अतिशय अभिमानाची बाब आहे.
- पुणे मेट्रोकरिता ३४ मेट्रो ट्रेनची ऑर्डर -
- प्रत्येक ट्रेनला ३ कोच असतील
- पुणे मेट्रोकरिता १०२ कोचची पूर्ती टिटागढ वॅगन्स करणार.
- एका कोचची लांबी २९ मीटर आणि उंची ११.३० मीटर. कोचची रुंदी २.९ मीटर.
- प्रतिकोच आसनक्षमता ३२०